दिव्यांगांना मानसिक आधाराची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:44 IST2021-09-23T04:44:04+5:302021-09-23T04:44:04+5:30
मल्हारपेठ (ता. पाटण) येथे साहस डिसॅबिलिटी ॲन्ड रिसर्च केअर फाऊंडेशनच्यावतीने कऱ्हाड व पाटण तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींचा मेळावा घेण्यात ...

दिव्यांगांना मानसिक आधाराची गरज
मल्हारपेठ (ता. पाटण) येथे साहस डिसॅबिलिटी ॲन्ड रिसर्च केअर फाऊंडेशनच्यावतीने कऱ्हाड व पाटण तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींचा मेळावा घेण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील यांच्याहस्ते दिव्यांगांना सायकलींचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी साहस फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. नसीमा हुरजूक, मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक उत्तमराव भापकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी व सन्मानाने जगता यावे, यासाठी साहस फाऊंडेशन विविध उपक्रम राबवत असल्याचे समाधान आहे. तसेच ही संस्था दिव्यांगांसाठी रोजगार उपलब्ध करून देत स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्नशील राहत असून, ही बाब कौतुकास्पद आहे. त्यांच्या या उपक्रमामुळे दिव्यांगांना मोठा आधार मिळत आहे. साहस फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेले हे कार्य उल्लेखनीय असून, दिव्यांगांप्रती फाऊंडेशनची असलेली सहानुभूती त्यांना उभे राहण्याचे नक्कीच बळ देईल.
साताराम पाटील, मधुताई पाटील, विजय पाटील, डॉ. अशितोष नांगरे, राजाराम कुंभार, डॉ. पूनम संकपाळ यांची उपस्थिती होती.
फोटो : २२केआरडी०२
कॅप्शन : मल्हारपेठ (ता. पाटण) येथे दिव्यांगांना खासदार श्रीनिवास पाटील यांच्याहस्ते सायकल वाटप करण्यात आले.