कोरोना काळातील महसूल करासह दंड माफ व्हावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:40 IST2021-09-11T04:40:19+5:302021-09-11T04:40:19+5:30
मलटण : कोरोनाच्या भीषण परिस्थितीमध्ये अनेक नागरिकांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. रोजच्या जगण्याचा बिकट प्रश्न समोर असताना, ...

कोरोना काळातील महसूल करासह दंड माफ व्हावा
मलटण : कोरोनाच्या भीषण परिस्थितीमध्ये अनेक नागरिकांची आर्थिक घडी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. रोजच्या जगण्याचा बिकट प्रश्न समोर असताना, फलटण पालिका प्रशासन महसूल करावर भरमसाठ दंड आकारत आहे. या दंडाची तुलना केली असता, बँका किंवा खासगी सावकारांच्या व्याजापेक्षा जास्त हा दंड आकारला जात आहे, तो माफ करावा,’ अशी मागणी फलटण येथील सामाजिक कार्यकर्त्या कांचन कन्होजा खरात व फलटण पालिकेतील गटनेते नगरसेवक अशोकराव जाधव, नगरसेवक सचिन अहिवळे यांनी केली.
मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महिला सबलीकरणअंतर्गत महिलांच्या नावावर असणाऱ्या सर्व मिळकतींवर पन्नास टक्के महसूल शुल्कमाफी देण्यात यावी, अशीही मागणी खरात यांनी केली. यावेळी नगरसेवक अशोक जाधव यांनी या पद्धतीची कर माफी इतर काही पालिकांमध्ये केली असल्याचे व फलटण पालिकेने अशी करमाफी त्वरित करावी, अशी मागणी केली. कोरोना काळात जनसामान्यांचे जगणे हलाखीचे झाले असताना, महसूल करावर सावकारी दंड आकारून नागरिकांवर अन्याय केला जात आहे. त्यामुळे कोरोना काळातील संपूर्ण कर व त्यावरील दंड माफ करण्यात यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
090921\0948img-20210908-wa0107.jpg
.