शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

पाटणला कडकनाथकडून दोनशे जणांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2019 4:17 PM

पाटण तालुक्यातील जवळपास दोनशेजणांची महारयत या कंपनीच्या कडकनाथवर विश्वास ठेवून अंडी उत्पादन व कोंबडी पालन अशा व्यवसायात लाखो रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, सध्या कडकनाथकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने तालुक्यातील गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. याबाबत आंदोलन करण्याचा निर्णय पाटण येथे मंगळवारी झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी घेतला.

ठळक मुद्देपाटणला कडकनाथकडून दोनशे जणांची फसवणूकगुंतवणूकदार हवालदिल : लाखो रुपयांचा घातला गंडा

पाटण : पाटण तालुक्यातील जवळपास दोनशेजणांची महारयत या कंपनीच्या कडकनाथवर विश्वास ठेवून अंडी उत्पादन व कोंबडी पालन अशा व्यवसायात लाखो रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, सध्या कडकनाथकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने तालुक्यातील गुंतवणूकदार हवालदिल झाले आहेत. याबाबत आंदोलन करण्याचा निर्णय पाटण येथे मंगळवारी झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी घेतला.पाटण येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी शेतकऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर आणि विक्रमबाबा पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.पाटण तालुक्यातील मोरगिरी, तारळे, चाफळ, पाटण, ढेबेवाडी, मल्हारपेठ विभागात लोकांनी गुंतवणूक करून स्वखर्चाने कोंबडी पालनासाठी मोठी शेड्स उभी केलेली आहेत आणि कडकनाथकडे डिपॉझिट म्हणून लाखो रुपये ठेवले आहेत. तर काही शेतकऱ्यांनी तीन-तीन महिने कष्ट घेऊन कोंबडी पिलांचे संगोपन केले.

यातून काहीतरी फायदा होईल म्हणून परिश्रम घेतले आणि जास्त वजनाच्या झालेल्या कोंबड्या संबंधित कंपनीकडे सुपूर्द केल्या तर अंडी देणाऱ्या कोंबड्यांचे पालन केले. त्यातून मिळविलेली अंडी कडकनाथला दिली. परंतु त्याचे पैसे मात्र कडकनाथकडून संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आले नाहीत.पाटण तालुक्यातील सुमारे १८० जणांचे लाखो रुपयांचे येणे कडकनाथ कंपनीकडून आहे. याबाबत लवकरच तहसीलदारांना निवेदन देऊन आंदोलन करण्याच्या निर्णय संबंधित शेतकऱ्यांनी घेतला आहे. या शेतकऱ्यांसमवेत पाटण येथील शासकीय विश्रामगृहात श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर व विक्रमबाबा पाटणकर यांची एक बैठक पार पडली. व या बैठकीत करण्यात येणाऱ्या आंदोलनाबाबत दोघांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

 

टॅग्स :fraudधोकेबाजीSatara areaसातारा परिसर