शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
3
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
4
Top Marathi News Live: उत्तर महाराष्ट्र अन् मराठवाड्याला 'हीट वेव्ह'चा इशारा; मुंबईसह उत्तर कोकणात उकाडा असह्य होणार
5
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
6
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
7
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
8
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
9
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
10
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
11
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
12
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
13
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
14
Ilma Afroz : वडिलांचं छत्र हरपलं, शेतात घाम गाळला; आईने पणाला लावलं आयुष्य, लेक झाली IPS अधिकारी
15
"आज सासऱ्यांना मिस करतेय, रिंकूची खेळी त्यांच्यासाठी होती"; KKR जिंकल्यावर प्रिया सरोज भावूक
16
बर्थडे पार्टीत रक्ताचा सडा! चेहऱ्याला केक लावल्याच्या रागातून भाजप नेत्याच्या भावांसह तिघांची हत्या
17
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
18
Home Loan घेण्यासाठी किमान किती असावा लागेल Credit Score; अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
19
आपच्या त्या सात फुटीर खासदारांबाबत राज्यसभा सभापतींनी घेतला मोठा निर्णय, विलिनिकरणाबाबत दिले असे आदेश    
Daily Top 2Weekly Top 5

गाळ्यांसाठी पंचायत समिती निघाली लाभार्थींच्या शोधात

By admin | Updated: April 15, 2015 23:55 IST

ग्रामपंचायतींना नोटिसा : दारिद्र्यरेषेखालील बचत गटांचा शोध

सातारा : येथील राधिका रोडलगत असणाऱ्या प्रतापसिंह बझारला महिन्यापूर्वी पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांनी टाळे लावले होते. मात्र, सध्या या बझारातील गाळे दारिद्र्यरेषेखालील लाभार्थिंनींना देण्यात येणार आहेत. त्यासाठी सध्या पंचायत समिती नवीन लाभार्थींच्या शोधात आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत बचतगटातील महिलांना २००२ सालापासून देण्यात येत होते. दरम्यान, गाळे मालकांनी स्वत:चा व्यवसाय बंद करून पोट भाडेकरू ठेवण्यात आले. याच कालावधीत प्रशासनाने भेट दिली. त्यावेळी गाळ्यांमध्ये पोट भाडेकरू असल्याची बाब प्रशासनाच्या लक्षात आली. त्यामुळे प्रतापसिंह बझारला महिन्यापूर्वी टाळे लावण्यात आले होते. दारिद्र्यरेषेखालील बचत गटातील महिलांना शासन निर्णयातील तरतुदीनुसार नाममात्र शुल्कात गाळे देण्यात येणार आहेत. या संदर्भात पंचायत समितीने ग्रामपंचायत कार्यालयांना नोटिसा देऊन गाळ्यांमध्ये व्यवसाय करण्यासंदर्भात कळविण्यात आले आहे. व्यावसायिकांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजार उपलब्ध व्हावा. उत्पादकांकडून ग्राहकांपर्यंत दर्जेदार वस्तू रास्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी प्रतापसिंह बझाराची निर्मिती करण्यात आलेली आहे.गरजू महिला बचत गट किंवा व्यावसायिकांनी गाळे भाडेतत्त्वावर घेण्याबाबत अर्ज करावेत, असे आवाहन गटविकास अधिकारी चंद्रकांत जगताप यांनी केले आहे. (प्रतिनिधी)गाळे ताब्यात दिल्यानंतर व्यावसायिकांनी चांगल्या पद्धतीने व्यवसाय करावा. त्यातून व्यवसाय वृद्धी करावी. जास्तीत जास्त व्यवसाय करून दारिद्र्यरेषेतून बाहेर पडावे. व्यवसायातून अधिकाधिक अर्थाजन केल्यामुळे त्यांना जीवनमान उंचवण्यास मदत होईल.- चंद्रकांत जगताप, गटविकास अधिकारी