शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

पालखी मार्गाचे काम कासव गतीने, नागरिक संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2020 2:05 PM

padhrpur, Alandi, roadsefty, satara आळंदी-पंढरपूर-मोहोळ या केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी महामार्गाचे काम कासवगतीने सुरू आहे. यामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. या कामाची गती न वाढल्यास १० नोव्हेंबर रोजी रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा बाधित शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.

ठळक मुद्दे पालखी मार्गाचे काम कासव गतीने, नागरिक संतप्तआळंदी-पंढरपूर-मोहोळ महत्त्वकांक्षी रस्त्यासाठी रास्ता रोकोचा इशारा

फलटण : आळंदी-पंढरपूर-मोहोळ या केंद्र सरकारच्या महत्त्वकांक्षी श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी महामार्गाचे काम कासवगतीने सुरू आहे. यामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. या कामाची गती न वाढल्यास १० नोव्हेंबर रोजी रास्ता रोको करण्यात येईल, असा इशारा बाधित शेतकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर पालखी महामार्गाच्या समन्वय समितीने फलटणचे उपविभागीय अधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रस्ते वाहतूक महामार्ग मंत्रालय भारत सरकार यांनी २६ मे २०१५ रोजी पालखी महामार्गाची अधिसूचना काढली होती.

फलटण तालुक्यातील २६ गावांतील ६४१८ शेतकऱ्यांची १००.३८ हेक्टर जमीन यासाठी संपादित होणार आहे. त्याशिवाय या क्षेत्रात येणारी राहती घरे, विहीर, बोअरवेल, गोठा, पत्राशेड, झाडे, हॉटेल, दुकाने व इतर उद्योग व्यवसाय बाधित होत आहेत, त्याची मोजदाद होणे बाकी आहे. संपादित जमीन नुकसान भरपाई वाटप जानेवारी २०२० मध्ये सुरू केले.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च ते जून कालावधित कामकाज बंद राहिले. त्यानंतर कामकाज सुरू झाले. परंतु भारत सरकारने मंजूर करूनही प्रत्यक्ष बाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम मिळण्यात भरपाई मिळण्यात अडचणी येत आहेत. उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक १६ यांचे सातारा येथील कार्यालयामध्ये कायमस्वरुपी पूर्णवेळ अधिकारी नियुक्त करावा. विद्यमान अधिकारी कार्यालयामध्ये पूर्णवेळ उपस्थित नसतात, त्यामुळे नुकसान भरपाई वितरण प्रक्रिया थंडावली आहे. फेर सर्व्हेक्षण व अवॉर्ड प्रसिद्ध होत नाहीत. भूसंपदनाशिवाय या क्षेत्रातील राहती घरे, विहीर, बोअरवेल, गोठा किंवा हॉटेल, दुकाने, उद्योग वगैरेंचे नुकसान भरपाईबाबत अवॉर्ड नोटीस संबंधित शेतकऱ्यांना मिळाली नाही.ज्या संपादित जमिनींमध्ये मालक व कूळ, वाहिवाटदार यांना जमीन संपादन नुकसान भरपाई नोटीस मिळालेल्या नाहीत त्या मिळाव्यात, पूर्वीच्या अवॉर्डमध्ये एकत्रित नावाचा उल्लेख आहे, त्याऐवजी वैयक्तिक खातेदारानुसार वहिवाटीनुसार जेएमसीचा आधार घेऊन फेर नोटिसा काढा.

वास्तविक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ बाबत चौथा टप्पा धर्मपुरी ते बाळूपाटलाचीवाडी या कामाच्या निविदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यामार्फत प्रसिद्ध केली असताना बाधित शेतकऱ्यांपैकी ४० टक्के शेतकऱ्यांनाही नुकसान भरपाई मिळाली नाही.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूकSatara areaसातारा परिसरAlandiआळंदी