शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तान सरकारचा सहभाग : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2025 16:24 IST

संरक्षणमंत्री काळात नऊ टक्के मुलींना संधी

सातारा : पाकिस्तानने दहशतवाद्यांशी संबंध कितीही नाकारले, तरी ठार केलेल्या दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत पाक सैनिक आणि त्यांचे सरकारी प्रतिनिधी कसे हजर राहतात? त्यामुळे दहशतवादी हल्ल्यातील पाकिस्तान सरकारचा सहभाग स्पष्ट होतो, असे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील रयत शिक्षण संस्थेच्या प्रांगणात त्यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.शरद पवार म्हणाले, “दहशतवादी हल्ल्यापासून सर्वांच्या नजरा टीव्ही चॅनेलकडे आहेत. भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे पाकिस्तानला धडा शिकविला. ठार झालेल्या दहशतवाद्यांना निरोप देताना पाकिस्तानचे प्रतिनिधी हजर राहतात. याचाच अर्थ, दहशतवादी कृत्यांच्या पाठीमागे त्या देशाची सत्ता आहे. सैन्यदलात अनेक महिलाही कर्तृत्व गाजवत असल्याचा आनंद आहे. पाकिस्तानवरील कारवाईची माहिती सैन्यातील ज्या दोन भगिनींनी दिली. त्यापैकी एक बेळगाव येथील सोफिया कुरेशी असून, मुस्लीम समाजातील आहेत. देशातील सर्व समाज घटक देशाच्या रक्षणासाठी पडेल, ती किंमत देण्यासाठी तयार आहेत.”संरक्षणमंत्री काळात नऊ टक्के मुलींना संधीमी संरक्षणमंत्री असताना तिन्ही दलांच्या प्रमुख, परराष्ट्र खाते आणि संरक्षण दलाचे सचिव दररोज आढावा बैठक घेत असे. एका बैठकीमध्ये मी सैन्यदलात महिलांच्या सहभागाचा मुद्दा मांडला असता, तिन्ही सैन्यदल प्रमुखांनी अशक्यता दर्शविली. पुढील दोन बैठकांत हेच घडले. मात्र, चौथ्या बैठकीत मी भारताच्या सैन्यात नऊ टक्के मुलींना संधी देण्याचा निर्णय घेतला, असे पवार म्हणाले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तानterroristदहशतवादीSharad Pawarशरद पवार