न्यायालयाच्या आवारात सशुल्क वाहनतळ
By Admin | Updated: November 23, 2014 23:47 IST2014-11-23T20:44:49+5:302014-11-23T23:47:26+5:30
शासकीय कर्मचारी, वकिलांना शुल्क नाही

न्यायालयाच्या आवारात सशुल्क वाहनतळ
सातारा : येथील जिल्हा न्यायालयाच्या आवारात पाच दिवसांपासून वाहनांसाठी ‘पे अँड पार्क’ सुरू करण्यात आले आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत हे पार्किंग सुरू आहे.
जिल्हा न्यायालयाच्या आवारातून दुचाकींची चोरी होत होती. तसेच कोणीही येथे वाहने लावून जात होते. दिवसभरात आपली कामे करून नंतर येथून वाहने घेऊन जात होते. यापार्श्वभूमीवर सध्या सुरू असणारे ‘पे अँड पार्क’ महत्त्वाचे ठरणार आहे. हिमालय सेवा संस्थेच्या वतीने हे ‘पे अँड पार्क’ चालविण्यात येत आहे. सध्या मनोज धनावडे हे येथील व्यवस्थापन पाहतात. सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत हे पार्किंग असणार आहे. दुचाकी वाहनांसाठी दहा रुपये तर चारचाकी वाहनांसाठी वीस रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. वाहनधारकांना पावती देण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
शासकीय कर्मचारी, वकिलांना शुल्क नाही...
उच्च न्यायालयाच्या आदेशाने हे ‘पे अँड पार्क’ सुरू करण्यात आले आहे. येथे शासकीय कर्मचारी, राजकीय नेते, पत्रकार, वकील यांच्या वाहनांसाठी शुल्क आकारले जाणार नाही, अशी माहिती मनोज धनावडे (केळघर) यांनी दिली.