जंतरमंतर दिल्ली येथे भारतीय संविधानाच्या प्रती जाळल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी फलटण येथे संविधान समर्थन मोर्चा काढण्यात आला. यामध्ये शेकडो नागरिक सहभागी झाले होते. ...
रहिमतपूर येथील नगरपरिषदेच्या हद्दीतील ३८ इमारतींमधील काहींना शंभरहून अधिक वर्षे झाले आहे. त्यामुळे धोकादायक इमारतींच्या संबंधित मिळकतदारांना नोटिसा बजावले आहे. तसेच तत्काळ इमारतींचा वापर बंद करण्याच्या सूचना पालिकेने दिल्या आहेत. ...
दहिवडी : माण तालुक्याचे लक्ष लागलेल्या बिदाल येथे बैलाच्या तोरण मारण्याच्या शर्यती नागपंचमीदिवशी पार पडल्या. शर्यतीचे हे ३७ वे वर्ष असून, यामध्ये अठरा फुटांवरील तोरण बैलांनी मारले.यास्पर्धेत ५६ बैल सहभागी केले होते. पहिले तोरण १३ फुटांवर चढवले. त्या ...
सातारा : आपल्या काव्यमधूर बोलण्यातून सोबत येणाऱ्यावर गारुड घालणाºया अटलबिहारी वाजपेयी यांच्यासोबत जवळ बसून भोजन करण्याची संधी जावळी तालुक्यातील आनेवाडी गावचे निवृत्त शिक्षकव भाजपचे त्या काळातील प्रचारक मधू पवार यांना मिळाला होता. ‘सतारा से आए हो तो ...
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील वेगळेपण जपणारा बोरीचा बार गुरुवारी खंडाळा तालुक्यातील सुखेड-बोरी गावाच्या सीमेवर रंगला. सुखेड-बोरी दोन गावांतील महिलांनी गावच्या सीमेवरील ओढ्याजवळ येऊन एकमेकींना शिव्यांची लाखोली वाहिली. ...
सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढत असून, कोयना धरण परिसरात गुरुवारी सकाळपर्यंत १०९ मिलीमीटर पाऊस झाला तर धरणात १०२ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी दुपारी बाराच्या सुमारास धरणाचे दरवाजे चार फुटांपर्यंत ...
सातारा येथील नकाशपुरात १४ वर्षीय शाळकरी मुलाला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आणखी तीन रुग्ण संशयित म्हणून आढळले असल्याने पालिकेने याची तत्काळ दखल घेऊन उपाययोजना सुरू केल्या आहेत. ...
सातारा शहरातील भूविकास बँक चौकात सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एक चोरटा दुचाकी चोरीचा प्रयत्न करून पळत होता. त्याला शाहूपुरी वाहतूक शाखेच्या पोलिसाने एक किलोमीटर धावत पकडल्याचा थरार घडला. ...
जगदिश कोष्टी ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : शिक्षकाला शिक्षिका, इंजिनिअरला इंजिनिअर जोडीदार हवा असतो; पण लष्करी अधिकारी असलेल्या जोडीदाराशी लग्न केल्याचे कोठे एकीवात नसेल; पण सैैनिकांच्या सातारा जिल्ह्यातच हा चमत्कार घडू शकतो. भरतगाववाडी येथील जगताप ...