उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाहने जळून खाक होण्याचे प्रकार वाढत असून, अचानक वाहन जळाल्याने वाहनमालकांवर मोठे आर्थिक संकट कोसळत आहे. जुन्या वाहनांना विमा पूर्ण भरला जात नाही. त्यामुळे भरपाईचीही रक्कमही वाहन मालकाला अगदी अल्प मिळते. ...
काशीळ-पाल मार्गावरील पाल गावाच्या हद्दीत अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असून, जनावरांनी अर्धवट खाल्ला आहे. संबंधित युवकाचा खून करून मृतदेह तेथे टाकण्यात आला असावा, अशी शक्यता पोलिसांकडून वर्तविली जात आहे. ...
दहावीच्या परीक्षेला कोल्हापूर विभागातील भरारी पथकांनी शिरोली पुलाची (जि. कोल्हापूर) येथील केंद्रावर कॉपी सारख्या गैरप्रकाराचा अवलंब करणाऱ्या आणि वडूथ (जि. सातारा) येथील परीक्षा केंद्रावर एका तोतया परीक्षार्थीला पकडले. ...
सातारा सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढत असून, पाण्याची भीषण टंचाई होण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने जिल्ह्यातील १९९ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचा निर्णय घेतला असून, या सर्व विहिरी तीन महिने शासनाच्या ताब्यात घेण्यात ये ...
सध्या सर्वत्र रब्बी पिकांची काढणी तसेच मळणीची लगबग सुरू आहे. खटावमध्ये रब्बी ज्वारीबरोबरच गव्हाचे उत्पादन घेत असलेल्या शेतकऱ्यांची गहू मळणीची लगबग सुरू आहे. गव्हाची सुगी झटपट घरी नेण्यासाठी हार्वेस्ट मशीनचा वापर करण्यावर शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. ...
शेतीवरची संकटे दूर करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाहोचवावे लागेल. मातीशी तुटलेले नाते पुन्हा निर्माण करावे लागेल. केंद्र सरकारची फुड पार्कची योजना अत्यंत प्रभावी असून मेगा फुड पार्कच्या माध्यमातून कृषी क्षेत्रात नवी अर्थव्यवस्थ ...
गेल्या काही महिन्यांपासून गाजत असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेतील ३७६ जणांच्या नोकर भरतीची प्रक्रिया रद्द करण्याचे आदेश महारष्ट्र शासनाच्या सहकार खात्याने दिला. या निर्णयामुळे जिल्ह्यात खळबळ माजली असून आमदार जयकुमार गोरे गटाने आनंद व्यक्त केला ...
फडतरवाडी (नेर) ता. खटाव येथील श्रीमंत मारुती फडतरे यांच्या गट नं. ४५८ मधील शेतात असलेल्या उसाच्या फडाला शॉर्टसर्किटमुळे आग लागून सव्वा एकर क्षेत्रावरील ऊस खाक झाला. या आगीत संबंधित शेतकऱ्यांचे सुमारे एक लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. ...
मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यातील तापोळा या पर्यटनस्थळाला बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कोयना धरणाची पाणीपातळी खालावल्याने जलाशयातील अनेक उंचवटे पाण्याबाहेर आले असून, पाण्यातील ही बेटे पर्यटकांना आकर्षित करू लागली आहेत. ...
जागतिक वारसास्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कास पठारावर कार्यकारिणी समिती व वनविभाग यांच्याकडून वन्यजीवांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी येथील वीस कुंड्यांमध्ये वेळच्या वेळी पाणी सोडून सोय करण्यात आली आहे. ...