धोम वगळता मुख्य धरणांमधून विसर्ग सुरू, पावसाचा जोर कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 02:49 PM2018-07-21T14:49:54+5:302018-07-21T14:54:27+5:30

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी धोम वगळता मुख्य धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. सध्या कोयना धरणात ८३.६६ टीएमसी पाणीसाठा झाला असून, शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ५५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

 Apart from the dam, the main dams continue to flow, the rainfall is low | धोम वगळता मुख्य धरणांमधून विसर्ग सुरू, पावसाचा जोर कमी

धोम वगळता मुख्य धरणांमधून विसर्ग सुरू, पावसाचा जोर कमी

Next
ठळक मुद्दे धोम वगळता मुख्य धरणांमधून विसर्ग सुरू, पावसाचा जोर कमी  कोयनेत ८३.६६ टीएमसी पाणीसाठा; घरांची पडझड सुरूच

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी झाला असलातरी धोम वगळता मुख्य धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. सध्या कोयना धरणात ८३.६६ टीएमसी पाणीसाठा झाला असून, शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत ५५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर सततच्या पावसामुळे पश्चिम भागात घरांची पडझड सुरू झाली आहे.

गेल्या २० दिवसांपासून जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस कोसळत आहे. या पावसाचा जोर कमी झाला असलातरी ओढे, नाले खळाळू लागले आहेत. खाचरात पाणी साठल्याने भात लागणीस मोठा वेग आला आहे. पश्चिम भागात पाऊस होत असल्याने शेतीच्या कामावरही परिणाम जाणवत असल्याचे दिसत आहे.

शनिवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ५५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर धरणात ८३.६६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणात ३२,८५३ क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी धरणाचे दरवाजे साडेतीन फुटांनी उचलण्यात आले आहेत. त्यामधून १६,०६३ क्युसेक तसेच पायथा वीजगृहातून २१०० असा मिळून १८,१६३ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

पाणीपातळी वाढत राहिल्यास आणखी जादा विसर्ग करण्यात येणार आहे. यावर्षी पाऊस चांगला होत असल्याने गतवर्षीपेक्षा लवकरच धरण भरणार आहे.

जिल्ह्यातील इतर धरणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कण्हेरमध्ये ८.३० टीएमसी साठा असून, ५०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे.

उरमोडी धरणही ७.८६ टीएमसी भरले असून, २,३७० क्युसेक पाण्याची आवक होऊन ४०० क्युसेक विसर्ग झाला आहे. तारळी परिसरातही पाऊस सुरू असून, धरणसाठा ५.९ टीएमसी इतका झाला आहे. धरणातून २,५८१ क्युसेक पाण्याचा विसर्ग झाला आहे.


धरणक्षेत्रातील २४ तासांतील व एकूण पाऊस मिलिमीटरमध्ये

धोम ०३ (४७३)
कोयना ५५ (३१३८)
बलकवडी ३८(१६९०)
कण्हेर ११ (५५६)
उरमोडी २९ (८१७)
तारळी ३४ (१४९३)

साताऱ्यात ऊन पावसाचा खेळ...

सातारा शहर आणि परिसरात तीन आठवड्यांपासून पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडताना छत्री घेऊन, रेनकोट घालून बाहेर पडावे लागत आहे. शनिवारी सकाळीही पाऊस झाला. तर काही वेळानंतर ऊन पडले होते.

Web Title:  Apart from the dam, the main dams continue to flow, the rainfall is low

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.