तांबवेतील पी. डी. पाटील यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:28 IST2021-06-06T04:28:46+5:302021-06-06T04:28:46+5:30

तांबवे : येथील माजी सरपंच, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग ज्ञानदेव पाटील ऊर्फ पी. डी. पाटील ...

P. D. Patil passed away | तांबवेतील पी. डी. पाटील यांचे निधन

तांबवेतील पी. डी. पाटील यांचे निधन

तांबवे : येथील माजी सरपंच, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग ज्ञानदेव पाटील ऊर्फ पी. डी. पाटील (वय ८०) यांचे निधन झाले. जनमानसात रमणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख होती.

कऱ्हाड तालुक्याच्या राजकीय पटलावर त्यांनी आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, पी. डी. पाटील, विलासराव पाटील-उंडाळकर, खासदार श्रीनिवास पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासोबत त्यांनी काम केले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार मुख्यमंत्री असताना तांबवे गावात १९९९ साली माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या पुढाकाराने धर्मांध, जातीयवादी शक्तीविरोधी परिषद झाली होती. त्याच्या नियोजनात ते अग्रभागी होते.

तांबवे गावचे विद्यमान उपसरपंच अ‍ॅड. विजयसिंह पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : ०५पी. डी. पाटील

Web Title: P. D. Patil passed away