तब्बल दहा हजार प्रलंबित प्रकरणे निकालात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 14:35 IST2017-08-31T14:35:26+5:302017-08-31T14:35:26+5:30
खंडाळा : पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी पुणे विभागात शुन्य प्रलंबितता व दप्तर अदयावतीकरण मोहिम सुरु केली असुन या मोहिमेचा भाग म्हणुन खंडाळा तहसिल कार्यालयातील तब्बल दहा हजार प्रलंबित प्रकरणे निकालात काढली आहेत.

तब्बल दहा हजार प्रलंबित प्रकरणे निकालात
खंडाळा : पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी पुणे विभागात शुन्य प्रलंबितता व दप्तर अदयावतीकरण मोहिम सुरु केली असुन या मोहिमेचा भाग म्हणुन खंडाळा तहसिल कार्यालयातील तब्बल दहा हजार प्रलंबित प्रकरणे निकालात काढली आहेत.
झिरो पेंडंसी उपक्रमांतर्गत तहसिलदार विवेक जाधव यांनी तहसिल कार्यालय व मंडल अधिकारी कार्यालय यांचे अदयावतीकरण केले असल्याने तहसिल कार्यालयाचे रूप पालटले आहे. दरम्यान या मोहिमेच्या पहिल्या टप्यात शिल्लक प्रकरणांची निश्चिती करुन त्याचे निर्गतीकरण करण्यात आल्याने सर्वसामान्य जनतेच्या कामांना गती मिळाली आहे.