संक्रांतीचे वाण म्हणून ओटीबॅग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:29 IST2021-01-10T04:29:53+5:302021-01-10T04:29:53+5:30
रूपाली पाटील या साताऱ्यातील कन्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. या ठिकाणी त्या तीन ते पाच वयोगटातील मुलांना शिकवतात. ...

संक्रांतीचे वाण म्हणून ओटीबॅग
रूपाली पाटील या साताऱ्यातील कन्या शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. या ठिकाणी त्या तीन ते पाच वयोगटातील मुलांना शिकवतात. मुलांमध्ये स्वनिर्मितीची आवड निर्माण व्हावी म्हणून सतत काही ना काही नवीन वस्तू बनवत असतात. टाकावू वस्तूंपासून टिकावू वस्तू बनवितात.
दरम्यान, मार्चमध्ये कोरानाचा शिरकाव झाला अन् शाळा बंद झाली. मात्र नोकरी म्हणून करत असलेल्या या वेगळ्या कामाचे छंदात रूपांतर झाले. लॉकडाऊनमध्ये घरीच आहे, तर आपल्यातील कलेला वाव देण्याचा निर्णय त्यांनी घेतला. यातून सुरुवातीस घरी बोर्ड पेंन्टिग, वार्ली पेंन्टिग, घरातील टाकाऊ काचेच्या बाटल्यांवर पेंन्टिग केली आहे. त्यामुळे घराची चांगली सजावट झाली आहे.
त्यातून टाकून दिलेल्या ग्लासपासून हँगर, जुन्या टी-शर्टपासून नॅपकिन हँगर, ज्वेलरी बॉक्स, अक्रोड, पिस्ताच्या टरफलापासून दिव्यासमोर सजावट केली आहे. त्याला छान रंगरंगोटी केली असल्याने आकर्षक दिसत आहे. कापड दुकानदार कापडी पिशव्यांमधून कपडे देतात. त्यापासून मास्क बनविले आहेत. तसेच कपड्यांचे शिल्लक तुकडे, साडीची जरीपासून मास्क बनविले आहेत.
संक्रांतीला त्यातीलच काही वस्तू वाण म्हणून देणार आहेत. यामध्ये मास्क, हॅण्डबॅग देणार आहेत. ज्यांच्या घरी लहान मुले आहेत त्यांना कापडांपासून बनविलेले पेन स्टॅण्ड, चोळीचे खणापासून तयार केेलेले ज्वेलरी बॉक्स खास मैत्रिणीला देणार आहेत. त्यातून ओटी बॅग हे सर्व मैत्रिणींना नक्कीच आवडणार आहे, असा त्यांना विश्वास आहे.
चौकट
स्वनिर्मितीच्या आनंदच वेगळा
रूपाली पाटील यांना पूर्वीपासून काहीतरी वेगळे करण्याची सवय लागली आहे. त्यातूनच कोरोना काळात ही कला जोपासण्याची, स्वत:ला वेळ देण्याची संधी मिळाली. त्यातून अनेक टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक वस्तू बनविल्या आहेत. यामध्ये त्यांना स्वनिर्मितीचा आनंद मिळत आहे.
कोट
संक्रांतीला वाण देण्यासाठी वस्तू विकतच आणायला हवी, असे नाही. आपल्या घरातील टाकावू वस्तूंपासून छान वस्तू बनविता येतात. अनेक गोष्टी इंटरनेटवरही उपलब्ध आहेत. त्यांचा वापर केल्यास नक्कीच फायदा होईल.
- रूपाली पाटील, सातारा.
चौकट
लहान-लहान वस्तूंचा होऊ शकतो चांगला वापर
प्रत्येकाच्या घरात अनेक वस्तू येत असतात. त्या आपण कळत न कळत टाकून देतो. कपड्यातील फोन, थर्माकॉल, टिकल्या, गुंड्या, नेटचे कापड या वस्तू टाकून देतो. तसेच नवीन आणायचे म्हटले तरी, फार खर्च नसतो. पण त्यापासून वस्तू बनविल्यामुळे घराची चांगली सजावट करता येते.
फोटो प्रगती मॅडमकडे येणार आहे...