..अन्यथा 'एकला चलो'ची भूमिका घेणार, रिपाईचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांचा इशारा
By दीपक देशमुख | Updated: April 12, 2023 15:59 IST2023-04-12T15:59:05+5:302023-04-12T15:59:21+5:30
सातारा: केंद्रात भाजप व आमची महायुती झाल्यापासून आजपर्यंत त्यांच्याकडून आम्हाला साधं विचारलं देखील जातं नाही. सातारा, वाई, पाचगणी, महाबळेश्वर ...

..अन्यथा 'एकला चलो'ची भूमिका घेणार, रिपाईचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांचा इशारा
सातारा: केंद्रात भाजप व आमची महायुती झाल्यापासून आजपर्यंत त्यांच्याकडून आम्हाला साधं विचारलं देखील जातं नाही. सातारा, वाई, पाचगणी, महाबळेश्वर स्वबळावर लढवू शकतो. साताऱ्यात किमान चार-पाच नगरसेवक निवडून आणण्याची आमची ताकद आहे. त्यामुळे सोबत घेतलं तर लढू अन्यथा एकला चलो अशी भूमिका घेणार आहे, अशी परखड भूमिका रिपाईचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी व्यक्त केली. सातारा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सवाच्या नियोजनाबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
साताऱ्यात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव साजरा होणार असल्याचे सांगून १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करणार असल्याचे सांगितले.
दरम्यान युतीबाबत बोलताना गायकवाड म्हणाले, आमच्या ताकतीनुसार आम्हाला जागा द्याव्यात. युती झाल्यापासून त्यांना आम्ही वारंवार आवाहन करत आहोत. मात्र कसलीही चर्चा करत नाहीत. आमची युती नेमकी कसली आहे तेच कळेना. फक्त आमच्या साहेबांची तेवढी युती दिसत आहे. जर सन्मानपूर्वक सोबत घेतले नाही तर ऐनवेळी मी युती तोडतो. राष्ट्रवादीला आणि काँग्रेसलाही याचा अनुभव आहे. त्यामुळे आमच्या नादाला लागू नका, असा इशाराही गायकवाड यांनी भाजपाला दिला आहे.