अन्यथा जिल्हाभर किसान सत्यागृह आंदोलन
By Admin | Updated: January 14, 2015 23:37 IST2015-01-14T20:53:31+5:302015-01-14T23:37:42+5:30
राहूल घाडगे : भूसंपादन कायद्यातील बदलांना युवक काँग्रेसचा कडाडून विरोध

अन्यथा जिल्हाभर किसान सत्यागृह आंदोलन
लोणंद : शेतकऱ्यांचे हित जनतेसमोर ठेवून काँग्रेस सरकारने जुना ब्रिटीशकालीन भूसंपादन कायदा बदलला होता. मात्र उद्योगपतींना धार्जीण असणाऱ्या भाजप सरकारने मूठभर उद्योजकांचे हित डोळ्यासमोर ठेवून भूसंपादन कायद्यात बदल करण्याचा घाट घातला आहे.युवक काँग्रेसकडून विरोध दशर्वला असून भूसंपादन कायद्यात कायद्यात भाजप सरकारने बदल करून शेतकऱ्यांवर अन्याय केल्यास सातारा जिल्हा युवक काँग्रेस जिल्हाभर किसान सत्यागृह आंदोलन करणार असल्याची माहिती सातारा लोकसभा युवकचे अध्यक्ष राहूल घाडगे यांनी पत्रकार परिषदेत दिली.घाडगे म्हणाले, २०१३ साली सर्व पक्षांना विश्वासात धेऊन सरकारने नवीन भूसंपादन कायदा केला होता. मूळ ब्रिटीशकालीन भूसंपादन कायद्यातील शेतकरी विरोधी कलमे वगळून शेतकरी हित असणारा हा कायदा नववण्यात आला होता. मात्र आता भाजप सरकार उद्योजकांचे हित डोळ्यासमोर ठेवत या कायद्यात शेतकरी विरोधी बदल करत असून यामध्ये शेतकऱ्यांना न विचारता त्यांची वरनागी नसताना जमिन संदपान करून ती उद्योगपतींच्या घश्यात घालण्याचा घाट घातला आहे.घाडगे पुढे म्हणाले, ‘हा कायदा करून भाजप सरकार शेतकऱ्यांवर मोठा अन्याय करत असून या कायद्याला काँग्रेस व युवक काँग्रेसचा विरोध आहे. शेतकऱ्यांवर अन्याय झालयास युवक काँग्रेस जिल्हीभर किसान सत्यागृह आंदोलन उभारणार असून जनआंदोलन करण्यात येईल,’ असा इशाराही घाडगे यांनी यावेळी दिला. जयदिप शिंदे, अतूल पवार, वसीम फरास, युवराज गाढवे, ऋषिकेश मोहिते, विशाल डेरे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)