शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यात धडाम...! केंद्राचे धोरण आड आले;  बांगलादेश, सौदी अरब सारख्या देशांनी फिरवली पाठ
2
अविस्मरणीय अन् ऐतिहासिक! PM मोदींच्या हस्ते गोव्यात ७७ फूट उंच 'श्रीराम मूर्ती'चे अनावरण
3
“काँग्रेसमध्ये काही राहिले नाही, वडेट्टीवारांनी खांद्याला धनुष्यबाण लावावा”; कुणी दिली ऑफर?
4
Ayush Mhatre Century : षटकार-चौकारांची 'बरसात'; आयुष म्हात्रेचा २०० च्या स्ट्राइक रेटसह शतकी धमका!
5
भारताची क्षेपणास्त्र चाचणीची घोषणा, हिंदी महासागरात चौथे चिनी 'हेरगिरी जहाज' दाखल
6
SMAT 2025: अर्जुन तेंडुलकरची हवा! पहिल्या स्पेलमध्ये ५ धावांत २ विकेट्स घेत लुटली मैफील
7
सर्वांनी वयाच्या 30 व्या वर्षापूर्वीच जाणून घ्यायला हवं हे 'सीक्रेट'! असं करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग; तयार होईल मोठा निधी, आनंदात जगाल म्हातारपणी
8
गौतम गंभीरवर बीसीसीआय नाराज, कसोटी हरल्यानंतर जे बोलला, ते खटकले... 
9
Thailand Flood : हाहाकार! थायलंडमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस; १४५ जणांचा मृत्यू, ३६ लाख लोकांना फटका
10
धक्कादायक! अनियंत्रित कार तलावात कोसळली, चालक बेशुब्ध पडला, नाविक देवदूत बनून आला
11
नेपाळने भारताला डिवचले; 100 रुपयांच्या नवीन नोटेवर भारताचा भूभाग आपला दाखवला
12
हृदयद्रावक! साता जन्माची साथ २ दिवसांत सुटली; लग्नानंतर नवरदेवाचा बाथरुममध्ये संशयास्पद मृत्यू
13
चीनच्या शेजारी देशाने प्रचंड सोने घेतले; एवढे महाग असले तरी..., जगातील सर्वात मोठा खरेदीदार ठरला
14
भारताच्या अर्थव्यवस्थेची ताकद वाढली, दुसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी ८.२% वाढला
15
“प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन तपोवनातील वृक्ष तोडण्याचे कारण काय?”: उद्धव ठाकरे
16
विकला जाणार रतन टाटांचा व्हिला, खरेदीसाठी जुन्या मित्रानेच 'इंटरेस्ट' दाखवला; किती कोटी मोजणार?
17
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
18
सोलापूर बसस्थानावरील अस्वच्छतेबाबत आगार व्यवस्थापक निलंबित; प्रताप सरनाईकांचे आदेश
19
उफराटा...! ट्रम्प अमेरिकेत आयकर रद्द करणार, टेरिफ मधून आलेल्या पैशांवर भागवणार; घोडं काय, भाडं काय...
20
China Japan Tensions: जपान आणि चीनमध्ये तणाव वाढला, पंतप्रधानांचं विधान का ठरलं वादाचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

..अन्यथा कारखाने भंगाराच्या दरात तुमचा ऊस न्यायला मागे-पुढे बघणार नाहीत - राजू शेट्टी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 17:45 IST

टनाला १५ रुपये शेतकरी देणार नाहीत

औंध : ‘निसर्गाचा समतोल बिघडल्यामुळे यंदा उसाच्या उत्पादनात घट होणार आहे. कारखाने ऊस आम्हाला द्या म्हणून मागे लागतील. परंतु शेतकऱ्यांनी ऊसतोडीची गडबड करू नये, अन्यथा कारखाने भंगाराच्या दरात तुमचा ऊस न्यायला मागे-पुढे बघणार नाहीत. कारखानदार समाजसुधारक नसून लुटारूंची टोळी आहे. यंदा दराची काळजी करू नका. स्वाभिमानी शेतकरी संघटना खटाव तालुक्याला उच्चांकी दर मिळवून देणार आहे,’ असे प्रतिपादन शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले.गोपूज ता. खटाव येथे रविवारी ऊस दर निर्णायक बैठकीत ते बोलत होते. या वेळी सूर्यकांत भुजबळ, राज्य प्रवक्ते अनिल पवार, जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, अर्जुन साळुंखे, तालुकाध्यक्ष दत्तात्रय घार्गे, प्रदेश सरचिटणीस, सूर्यभान जाधव, जिल्हाध्यक्ष तानाजी देशमुख, अनिल कचरे, शरद खाडे, सचिन पवार, संतोष तुपे, सचिन जाधव, जयवंत खराडे, बापू निंबाळकर यांच्यासह विविध शाखांचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेट्टी म्हणाले, ‘साखर कारखानदारांची पाचही बोटे तुपात आहेत. रिकव्हरी व काटा चोरी करून काळा पैसा कमावण्याचा त्यांचा धंदा आहे. १९६६ च्या कायद्यानुसार १४ दिवसांच्या आत ऊस बिल अदा करावे असा कायदा असतानाही शेतकऱ्यांना वर्षभर वाट पाहावी लागत आहे. एक टनाचे पैसे कारखानदार पावणे सात हजार रुपये करत आहेत आणि शेतकऱ्यांना पैसे द्यायचे म्हटलं की परवडत नाही असा नारा देतात.यंदा ऊस मिळवण्यासाठी कारखान्यांच्या प्रचंड स्पर्धा निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी गडबड न करता आपल्या कष्टाने पिकवलेल्या ऊस पिकाचे योग्य दाम घेतल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही. खांडसरी व गूळ उत्पादन करणारे कारखानेसुद्धा एफआरपीच्या कायद्यात आहेत याची नोंद घ्या. दरम्यान लांडेवाडी, उंबर्डे, वडूज, चितळी, बनपुरीमधील ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये बिल्ला लावून प्रवेश केला.टनाला १५ रुपये शेतकरी देणार नाहीतमहाराष्ट्र सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ऊसबिलांमधून प्रतिटन १५ रुपये कपात करण्याचा निर्णय मंजूर केला आहे. आम्ही ती कपात करून देणार नाही. कर्जबुडव्या उद्योगपतीकडून व मोठ्या उद्योजकाकडून घ्यावी शेतकरी वर्गाचे पैसे घेऊ देणार नसल्याचे माजी खा. राजू शेट्टी यांनी सांगितले.एआय तंत्रज्ञान वापराऊस कमी पडल्याने शेतकऱ्यांना एआय तंत्रज्ञान वापरा, असे कारखानदार सांगत आहेत. मात्र अगोदर तुमच्या रिकव्हरी व काट्यात या तंत्रज्ञानाचा वापर करा व शेतकऱ्यांची लूट थांबवा, असेही शेट्टी यांनी यावेळी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Raju Shetti warns sugarcane factories against exploitative pricing practices.

Web Summary : Raju Shetti cautioned sugarcane factories against undervaluing farmers' produce, highlighting potential exploitation. He assured farmers that Swabhimani Shetkari Sanghatana will secure fair prices, opposing deductions and advocating for AI in factory processes to prevent farmer exploitation.