वाई : ‘यशवंतनगर गटात काडीचाही संबंध नसणाऱ्यांनी फुकटचा कळवळा आणू नये. विकासकामांत अडथळा आणून मतदारांची निव्वळ दिशाभूल करण्याचा विरोधकांकडून प्रयत्न सुरू आहे. विकासाच्या वल्गना करून दिशाभूल करण्याचा एककलमी कार्यक्रम चालू आहे,’ अशी खरमरीत टीका मंत्री मकरंद पाटील यांनी केली.यशवंतनगरमधील कोपरा सभेत ते बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती विजयसिंह नायकवडी, ज्येष्ठ नेते प्रतापराव पवार, विकास शिंदे, सरपंच मेघाताई सावंत यांची उपस्थिती होती. पाटील म्हणाले, ‘‘ज्या मंडळींनी या तालुक्यातील सहकारी संस्था मोडीत काढली, ती मंडळी मतांचा जोगवा मागताना दिसत आहे.
राजकीय स्वार्थापोटी विरोध करून यशवंतनगर गावच्या विकासाच्या आड येत रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याच्या वावड्या उठवीत ग्रामस्थांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत.’यावेळी बापूसाहेब शिंदे, संजय कांबळे, माजी सभापती विजयसिंह नायकवडी यांनी मनोगत व्यक्त केले. कुंडलिक सावंत यांनी प्रास्ताविक केले. प्रा. शामराव शिंदे यांनी आभार मानले.
Web Summary : Minister Makrand Patil criticizes opponents for obstructing development and misleading voters in Yashwantnagar. He accuses them of political opportunism and spreading false rumors about road construction corruption to gain votes. Patil highlighted their past failures in cooperative institutions.
Web Summary : मंत्री मकरंद पाटिल ने यशवंतनगर में विकास में बाधा डालने और मतदाताओं को गुमराह करने के लिए विरोधियों की आलोचना की। उन्होंने उन पर राजनीतिक अवसरवाद का आरोप लगाया और वोट पाने के लिए सड़क निर्माण में भ्रष्टाचार की झूठी अफवाहें फैलाने का आरोप लगाया। पाटिल ने सहकारी संस्थाओं में उनकी पिछली विफलताओं पर प्रकाश डाला।