शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

सातारा: 'रयत' कारखाना निवडणुकीतून विरोधकांची माघार; बिनविरोधाची औपचारिकता बाकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 13:33 IST

अपात्र ठरविलेल्या उमेदवारांनी साखर सहआयुक्त पुणे यांच्याकडे दाद मागितली. मात्र ही याचिका फेटाळण्यात आली

प्रमोद सुकरेकराड : शेवाळवाडी (ता. कराड) येथील रयत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक येत्या 24 जुलै रोजी होऊ घातली आहे. या निवडणुकीसाठी रयत व सहकार या दोन पॅनेलकडून अर्ज दाखल करण्यात आले होते. मात्र यातील सहकार पॅनेलने निवडणुकीतून माघार घेत असल्याचे आज, सोमवारी जाहीर केल्याने आता कारखाना निवडणूक बिनविरोधची औपचारिक घोषणा बाकी राहिली आहे. कारखान्याचे हित लक्षात घेऊनच आम्ही या निवडणूकीतून माघार घेत असल्याचे सहकार पॅनलचे प्रमुख अॅड. आनंदराव पाटील यांनी सांगितले.रयत सहकारी साखर कारखाना निवडणुकीसाठी विद्यमान अध्यक्ष अॅड उदयसिंह पाटील व त्यांचे चुलत बंधू व कारखान्याचे माजी अध्यक्ष जयसिंगराव पाटील यांचे वारसदार अॅड. आनंदराव पाटील यांनी परस्परविरोधी पॅनेल उभे केले होते. मात्र अर्ज छाननीवेळी आनंदराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहकार पॅनेलचे काही अर्ज अवैध करण्यात आले. त्यामुळे काही ठिकाणी जागा बिनविरोध होणार अशी परिस्थिती निर्माण झाली. त्यावर त्या अपात्र ठरविलेल्या उमेदवारांनी साखर सहआयुक्त पुणे यांच्याकडे दाद मागितली. मात्र ही याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे आता या निवडणुकीत काय होणार ?याबाबतची उत्सुकता लागून राहिली होती.दरम्यान आज, सोमवारी दुपारी सहकार पॅनलचे प्रमुख अॅड. आनंदराव पाटील व त्यांचे उमेदवारांनी कराड येथे पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. त्यावेळी त्यांनी आपण या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. अॅड. पाटील म्हणाले, रयत सहकारी साखर कारखान्याची उभारणी माजी मंत्री विलासराव पाटील व ज्येष्ठ नेते जयसिंगराव पाटील या दोन बंधूंनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केली. महाराष्ट्रात उभ्या राहिलेल्या कारखान्यापैकी अल्प खर्चामध्ये उभा राहिलेला रयत हा कारखाना आहे. पण त्यानंतरच्या काळात आलेला लोकरी मावा, गेटकेन ऊस, एफआरपी, आदिंमुळे कारखान्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे या दोन्ही बंधूनी अथणी शुगरला कारखाना चालवण्यास दिला. आज तो कारखाना कर्जमुक्त होण्याच्या मार्गावर आहे.खरंतर या निवडणुकीसाठी आमच्या पॅनेलने दाखल केलेले काही अर्ज बाद झाले. तरीही उर्वरित उमेदवार लढण्यासाठी तयार होते. मात्र ज्येष्ठ नेते जयसिंगराव पाटील यांनी शेतकरी, ऊस उत्पादक, कामगार व कारखान्याची आर्थिक परिस्थिती पाहता कोणतीही अट न घालता अर्ज मागे घेण्याच्या सूचना आम्हाला केल्या आहेत. सद्यस्थितीत कारखाना चालवायला दिला असल्याने निवडणुकीचा आर्थिक भार कारखान्यावर नको. कारखान्याचे हित लक्षात घेऊनच आम्ही या निवडणूकीतून माघार घेत  आहोत.सहकार्याची भूमिका घेऊनव्या संचालक मंडळाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन त्यांच्या उसाचे गाळप वेळेत करावे. मयत सभासदांच्या वारस नोंदी करून घ्याव्यात; कृष्णा नदीवरून करण्यात येणारी जलसिंचन योजना मार्गी लावावी; चांगला ऊस दर द्यावा; रोजगार निर्मितीला प्राधान्य द्यावे; को जनरेशन; वीज प्रकल्प; डिस्टलरी उभी करावी अशी अपेक्षा अँड. आनंदराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केली व यासाठी आपण सहकार्याची भूमिका घेऊ असेही यावेळी सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरSugar factoryसाखर कारखानेElectionनिवडणूक