शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

उद््घाटन झोकात; पाणी नाही रानात!

By admin | Updated: November 9, 2014 23:28 IST

तारळे-बांबवडे योजना : पोटपाटाचे काम रखडल्याने शेतकरी हवालदिल

तारळे : तारळे-बांबवडे उपसा सिंचन योजनेचे उद्घाटन होऊन वर्ष व्हायला आले तरी अजून पोटपाटाच्या कामाला सुरूवात झाली नाही. शेतकऱ्यांच्या उशाला धरण असूनही घशाला कोरड पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.प्रशासनाच्या उदासीनतेचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. निदान यंदा तरी शेतकऱ्यांना शेतीला पाणी मिळणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तारळी नदीवर बांधलेल्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावर कोट्यवधी रुपये खर्च करून तारळे व बांबवडे उपसा सिंचन योजनेची दोन पंपहाऊस बांधून पाईपलाईनची कामे पूर्ण झाली आहेत. यातून शेतीला पन्नास मीटर हेडपर्यंत पाणी उचलून देण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. फक्त पावसाळ्यात पाणी मिळणारी शेती बारमाही पाण्यासाठी आसुसली आहे. मात्र पोटपाटाच्या पाण्याला मुहूर्त मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.पाण्याअभावी शेतातील पिके करपून जात आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही शेतकऱ्यांसमोर उभा राहतो. शेती आहे; मात्र पाण्यावाचून तारळे भागातील शेतकरी हतबल झाला आहे. अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. प्रशासनाकडून मात्र केवळ कागदी घोडे नाचविण्यात येत आहेत. त्यामुळे शासनाकडून चालढकल होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांमधून होत आहे. पाणी उपलब्ध असूनही शेतीला मिळत नसल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. तारळे व बांबवडे उपसा सिंचन योजनेसाठी कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. जवळपास वर्षभरानंतरही पोटपाटाच्या कामात चालढकल होत असताना शेतकऱ्यांना नदीतून वाहणाऱ्या पाण्याकडे बघत बसावे लागत आहे. (वार्ताहर)शेकडो हेक्टर क्षेत्र वंचिततारळे भागातील शेकडो हेक्टर जमीन पाण्यावाचून वंचित आहे. संबंधित विभाग आज काम सुरू होईल, उद्या होईल, अशी आश्वासने देत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमून संताप व्यक्त होत आहे.बांबवडे उपसा सिंचन योजनेच्या पोटपाटाचे काम कण्हेर विकास विभागाकडे आहे. एक महिन्यानंतर पोटपाटाच्या कामांना सुरूवात करण्यात येणार आहे.- संजय पाटील,उपअभियंता, नागठाणे कार्यालय तारळे-बांबवडे उपसा सिंचन योजना अजून पोटपाटाच्या प्रतीक्षेत आहे.