बलकवडीत केवळ मृत पाणीसाठा

By Admin | Updated: May 6, 2017 16:20 IST2017-05-06T16:19:10+5:302017-05-06T16:20:14+5:30

धरणाने गाठला तळ : ऐन उन्हाळ्यात शेतीसह पिण्याच्या पाण्याची भीषणता वाढली

Only the water reservoir in Balakavadi | बलकवडीत केवळ मृत पाणीसाठा

बलकवडीत केवळ मृत पाणीसाठा

आॅनलाईन लोकमत

वाई (जि. सातारा), दि. 0४ : वाई, खंडाळा, फलटण तालुक्यांचे तारणहार असणाऱ्या बलकवडी धरणातील पाण्याने तळ गाठला असून, धरणात केवळ फक्त मृत पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे वाईच्या पश्चिम भागात ऐन मे महिन्यात पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले असून, त्यागाची भूमिका घेणाऱ्या भागातच ऐन उन्हाळ्यात काही किलोमीटरवरून पाणी आणावे लागत आहे.

बलकवडी धरणाची पाणी साठवण क्षमता चार टीएमसी इतकी आहे. वाई, खंडाळा, फलटण या दुष्काळग्रस्त भागांसाठी या धरणाची उभारणी करण्यात आली आहे. सध्या संपूर्ण राज्याला पाणीटंचाईच्या झळा बसत असून, वाई तालुक्यातही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. बलकवडी धरण अतिवृष्टीच्या परिसरात येत असल्याने गेल्या वर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरले. मात्र, फलटण तालुक्यात प्रमाणापेक्षा जास्त पाणी सोडल्याने धरणाने ऐन उन्हाळ्यात तळ गाठला आहे. धरणात केवळ मृत पाणीसाठा शिल्लक असल्याने त्याचा कोणत्याही बाबीसाठी वापर करता येणार नाही.

प्रशासनाच्या वतीने तालुक्यात सुरू असलेल्या ह्यजललक्ष्मीह्ण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला आहे. हा खर्च पाण्यात जाऊ नये याची खबरदारी घेऊन धरणातील पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. (प्रतिनिधी)

प्रशासनाकडून उपाययोजनेची गरज

बलकवडी धरणाने तळ गाठल्याने धरणावर अवलंबून असणारी शेती तसेच पाणी योजनांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या धरणाच्या उभारणीत ज्यांनी त्यागाची भूमिका निभावली त्या लोकांच्या नशिबीच पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ आली आहे. बलकवडी पाटबंधारे खात्याच्या गलथान नियोजनामुळे धरणात पाण्याचा थेंब शिल्लक राहिला नाही. संबंधित विभागाने या भागातील ग्रामस्थांच्या त्यागाचा विचार करून पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

Web Title: Only the water reservoir in Balakavadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.