शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
6
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
7
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना कोरा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
8
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
9
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
10
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
11
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
12
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
13
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
14
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
15
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
16
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
17
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
18
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
19
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
20
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी

केवळ तीनच महिन्यांत तलाव आटले! नांदलमध्ये पाणीबाणी : धोम-बलकवडीचे पाणी सोडण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 18:48 IST

नांदल हे फलटण तालुक्यातील पर्जन्यमान कमी असणारे गाव. जून महिन्यात पाऊस चांगला झाला. त्यानंतर या गावातील तब्बल आठ सिमेंट बंधारे काठोकाठ भरलेले होते. मात्र, केवळ तीनच महिन्यांत गावातील पाणीसाठा संपल्याने गावावर दुष्काळाचे सावट

मलटण : नांदल हे फलटण तालुक्यातील पर्जन्यमान कमी असणारे गाव. जून महिन्यात पाऊस चांगला झाला. त्यानंतर या गावातील तब्बल आठ सिमेंट बंधारे काठोकाठ भरलेले होते. मात्र, केवळ तीनच महिन्यांत गावातील पाणीसाठा संपल्याने गावावर दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे.माणमधील टाकेवाडी, भांडवली या गावांची यशोगाथा पाहिल्यानंतर नांदलसारख्या गावावर पाण्याचे संकट येणे ही खेदाची बाब आहे. या ठिकाणी कमिन्स इंडिया कंपनीमार्फत तब्बल आठ बंधाऱ्यांची निर्मिती केली गेली. दरवर्षी असणारी दुष्काळसदृश्य परिस्थिती काही प्रमाणात कमी झाली. गावातील तब्बल आठ बंधारे काठोकाठ भरले. गावकºयांनी आनंदोत्सव साजरा केला; केवळ तीनच महिन्यांत या आनंदावर विरजन पडले.जूननंतर गावातील शेतकºयांनी अनेक प्रकारची पिके घेतली. उसाचे मळेही दिसू लागले; पण जूननंतर पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने बंधाºयातील पाणीसाठा पूर्णपणे आटल्याची परिस्थिती आज निर्माण झाली आहे. त्यामुळे नांदलकरांमध्ये कभी खुशी कभी गम, अशीच अवस्था झाली आहे.गावातील विहिरींची पाणीपातळी खलावल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. जूनमध्ये झालेल्या पावसामुळे शेतकºयांनी खरिपाची पिके मोठ्या प्रमाणावर घेतली. काही शेतकºयांनी हमखास उत्पन्न देणारे पीक म्हणून उसाची लागणी केल्या; पण आॅगस्ट संपता-संपता पाणी पातळी एकदम खालावली. त्यामुळे त्वरित उपाययोजना करत धोम-बलकवडीचे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी नांदल, सुरवडी, मुळीकवाडी ग्रामस्थांमधून होत आहे.पाणी तलावांमध्ये सोडल्यास पाणी संकट दूर होईल..धोम-बलकवडीच्या कॅनॉलमधून पाणी सोडून फलटण तालुक्यातील मुळीकवाडी, हिंगणगाव, धुमाळवाडी, कुरवली येथील धरणात सोडण्यात येऊ शकते. सध्या धोम धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. नदीला पाणी सोडून देण्यापेक्षा ते छोट्या-छोट्या धरण व तलावांमध्ये सोडल्यास गावांचे पाणी संकट दूर होईल.

 

मुळीकवाडी तलावात धोम-बलकवडी कॅनॉलचे पाणी सोडून नांदल, सुरवडीमधील बंधारे भरण्यात यावे. यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल.-महादेव मोहिते, सरपंच, नांदल

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDamधरणwater shortageपाणीटंचाई