शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

चार दशकात केवळ एकच महिला आमदार :साताऱ्यातील चित्र केवळ १८ जणींनी दाखल केली उमेदवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2019 22:57 IST

यापैकी फलटणमध्ये कोणत्याही महिला उमेदवाराने निवडणूक लढवली नाही. माण, जावळी, पाटण आणि क-हाड उत्तर या मतदारसंघांत केवळ प्रत्येकी एकाच महिला उमेदवाराने निवडणूक लढविली आहे.

ठळक मुद्देकल्पनाराजे भोसले, वर्षा देशपांडे यांचाही समावेश

प्रगती जाधव- पाटील ।सातारा : महिलेच्या हाती सत्तेची दोरी देण्यात सातारा जिल्हा बराच मागं असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. गेल्या चाळीस वर्षांत कोरेगाव मतदारसंघातून डॉ. शालिनीताई पाटील वगळता कोणीही महिला आमदार झाली नाही. चार दशकांत जिल्ह्यातील केवळ १७ महिलांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. अपवाद वगळता प्रवाहातील मुख्य पक्षांनी महिलांना उमेदवारीही दिली नसल्याचे दिसत आहे.

सातारा जिल्ह्यात फलटण, वाई, कोरेगाव, माण, क-हाड उत्तर, क-हाड दक्षिण, पाटण आणि सातारा असे ८ विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी फलटणमध्ये कोणत्याही महिला उमेदवाराने निवडणूक लढवली नाही. माण, जावळी, पाटण आणि क-हाड उत्तर या मतदारसंघांत केवळ प्रत्येकी एकाच महिला उमेदवाराने निवडणूक लढविली आहे.

सातारा मतदारसंघातून राजघराण्यातील कल्पनाराजे भोसले यांनी शिवसेनेकडून उमेदवारी दाखल केली होती. त्यांना काँग्रेस पक्षाकडून लढणारे अभयसिंहराजे भोसले यांनी पराभूत केले. दलित महिला संघटनेच्या संस्थापिका आणि सामाजिक कार्यकर्त्या अ‍ॅड. वर्षा देशपांडे यांनी स्वाभिमानी पक्षाकडून २००९ मध्ये निवडणूक लढवली होती. तर २०१४ मध्ये काँग्रेसकडून रजनी पवार निवडणुकीला सामोरे गेल्या होत्या. निवडणुकीत पराभूत झाल्या असल्या तरीही या तिघींनी आपापल्या क्षेत्रात कार्यरत राहणं पसंद केलं.

काँग्रेस पक्षाची विचारसरणी मानणाºया कोरेगाव मतदारसंघाचे शंकरराव जगताप यांनी १९७८ ते १९९५ असे पाचवेळा प्रतिनिधित्व केलं. १९९० मध्ये पहिल्यांदा डॉ. शालिनीताई पाटील यांनी जनता दलातून अर्ज भरला. त्यांना ४४ हजार ६८८ मतं मिळाली. त्यानंतर १९९५ मध्ये अपक्ष लढून त्यांना ५३ हजार ८०७ मतं घेता आली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांनी १९९९ मध्ये निवडणूक लढवून ६१ हजार ६९२ मतं मिळवत पहिल्यांदा विजय संपादन केला. त्यानंतर २००४ मध्येही त्या कोरेगावच्या आमदार झाल्या. २००९ मध्ये राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांनी त्यांना पराभूत केलं.शालिनीताई पाटील एकमेव विजेत्या!पुरोगामी सातारा जिल्ह्यात राजकारणातील महिलांची ओळख ही प्रतीविधानसभा अर्थात जिल्हा परिषद अध्यक्षपदापर्यंतच मर्यादित राहिली आहे. जिल्ह्यात चार दशकांत डॉ. शालिनीताई पाटील यांचा अपवाद वगळता अन्य कोणत्याही महिला उमेदवाराला स्वत:च्या नावापुढे आमदार लावता आले नाही. विशेष म्हणजे जनता दल आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने शालिनीतार्इंना उमेदवारी देण्यात आली. दहा वर्षे अभ्यासू आमदार म्हणून त्यांनी कारकीर्द गाजवली.फलटणला एकही अर्ज नाहीफलटण तालुक्यात नाईक-निंबाळकर घराण्याचं राजकीय वर्चस्व राहिलं आहे. १९८०, १९८५ आणि १९९० या तिन्ही वेळेला चिमणराव कदम विजयी झाले. १९७८ ला विजयसिंह नाईक-निंबाळकर आणि १९९५ ते २००४ असे तीनवेळा रामराजे नाईक-निंबाळकर यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. मतदारसंघ आरक्षित झाल्यानंतर रामराजेंमुळे दीपक चव्हाण यांना आता तिसऱ्यांदा संधी मिळाली आहे.

फलटणच्या माहेरवाशीण आणि महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी या मतदारसंघातून लढण्याची तयारी केली होती. मात्र, ऐनवेळी राजकीय घडामोडीत त्यांनी माघार घेतली. तर आत्तापर्यंतच्या इतिहासात या मतदारसंघातून कोणाही महिलेने निवडणूक लढविली नाही.या महिलांनी लढवली निवडणूक...सातारा मतदारसंघवर्ष उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेली मते

  • १९९० कल्पनाराजे भोसले शिवसेना ३८ हजार ७८३
  • १९९५ लता पुंडलिक जाधव वंदे मातरम सेवा ४३९
  • २००९ अलंकृता बिचुकले अपक्ष १ हजार ५३४
  • २००९ वर्षा देशपांडे स्वाभिमानी पक्ष ७ हजार ३४९
  • २०१४ रजनी पवार राष्ट्रीय काँग्रेस ७ हजार १८७

माण मतदारसंघ१९९० कमल तुकाराम मस्के अपक्ष १ हजार ५३३१९९५ नंदा बबन सावंत बसपा ३ हजार ४३८२००९ संगीता पांडुरंग शेलार अपक्ष २ हजार ६६कºहाड उत्तर मतदारसंघ१९९५ इंदुबाई काकासोा पाटील अपक्ष ९२९कºहाड दक्षिण मतदारसंघ२००४ बनुबाई दगडू येवले अपक्ष २ हजार ८२१२०१४ विद्युलता मर्ढेकर अपक्ष ५४७वाई मतदारसंघवर्ष उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेली मते१९९० शारदा राजाराम चव्हाण अपक्ष १२८२००४ कुमुदिनी कोंढाळकर भारतीय स्त्रीवादी पक्ष १ हजार २७८२००९ सुधा संपत साबळे अपक्ष १ हजार ५३४कोरेगाव मतदारसंघ१९९० शालिनीताई पाटील जनता दल ४४ हजार ६८८१९९५ शालिनीताई पाटील अपक्ष ५३ हजार ८०७१९९९ शालिनीताई पाटील राष्ट्रवादी ६१ हजार ६९२ (विजयी)२००४ शालिनीताई पाटील राष्ट्रवादी ६१ हजार ३२६ (विजयी)२००९ शालिनीताई पाटील अपक्ष ४८ हजार ६२०जावळी मतदारसंघ१९९५ वनिता रामचंद्र बगाडे अपक्ष २२९पाटण मतदारसंघ१९९० विजयादेवी देसाई अपक्ष ४० हजार ००३* फलटण मतदारसंघ (निरंक)

 

टॅग्स :MLAआमदारSatara areaसातारा परिसर