सातारी तरुणांच्या ‘मोबाइल टेटस्’वर फक्त मिल्खा सिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:26 IST2021-06-20T04:26:42+5:302021-06-20T04:26:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : भारतातील धावपटू मिल्खा सिंग यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त प्रसारमाध्यमांतून समजताच ...

सातारी तरुणांच्या ‘मोबाइल टेटस्’वर फक्त मिल्खा सिंग
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : भारतातील धावपटू मिल्खा सिंग यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या निधनाचे वृत्त प्रसारमाध्यमांतून समजताच साताऱ्यातील तरुणाई हळहळली. अनेकांनी मिल्खा सिंग यांना श्रद्धांजली वाहणारे संदेश समाजमाध्यमांतून प्रसिद्ध केले, तर हजारो तरुणांनी ‘मोबाइलच्या टेटस्’वर मिल्खा सिंग यांचे छायाचित्र, चित्रफीत, गाणी ठेवली होती, तर काहींनी प्रोफाइललाही मिल्खा सिंगचे छायाचित्र ठेवले होते.
साताऱ्याला खेळाचाही चांगला वारसा लाभलेला आहे. कित्येक गावे ठरावीक खेळांसाठी प्रसिद्ध आहेत. ती ओळख जपण्यासाठी तेथील तरुणाई जीव तोडून सराव करत असते. त्यामुळे खेळाविषयी विशेष जाण आहे. त्याचप्रमाणे ते समाजमाध्यमातही सक्रिय असतात. मिल्खा सिंग यांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर अनेकांनी समाजमाध्यमातून श्रद्धांजली वाहिली.
चौकट
ऑलम्पिकमधील क्षण
‘मोबाइल टेट्स’वर आपल्या जीवनातील घटना, काही क्षण ठेवत असतो. मात्र, साताऱ्यातील तरुणाईने मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारित घटना, जुनी कृष्णधवल छायाचित्रे ठेवली आहेत. काहींनी त्यावर संदेश लिहिले आहेत, तर अनेकांनी ऑलम्पिकमधील धावतानाची छायाचित्रे, चलचित्रे ठेवली आहेत. ती लहान मुलांपासून मोठ्यांनाही भावत आहेत. बहुतांश लोकांनी ‘भाग मिल्का भाग’ चित्रपटातील गाणे ठेवले आहे.
कोट
मी पोलीस, सैन्य भरतीसाठी धावण्याचा सराव करत आहे. त्यासाठी जीव तोडून प्रयत्न करत आहे. यासाठी ‘आदर्श खेळाडू आणि त्यांचे महान कार्य’ हे पुस्तक वाचले होते. त्यातून मिल्खा सिंग यांचे काम आणि संघर्ष समजला. त्यामुळे आम्हा खेळाडूंना मिल्खा सिंग हे प्रेरणास्रोत आहे. मिल्खा सिंग यांच्याविषयी जास्तीत जास्त माहिती मिळविण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या जाण्याने मोठे दु:ख होत आहे.
- प्रणव तरडे,
बामणोली कुडाळ