कोरोनाच्या संकटातही ऑनलाइन योग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:27 IST2021-06-25T04:27:13+5:302021-06-25T04:27:13+5:30

वाई : ‘योग हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवला पाहिजे. योगामुळे आरोग्य निरोगी राहून रोग प्रतिकारशक्ती वाढते,’ असे मत ...

Online yoga even in the crisis of the corona | कोरोनाच्या संकटातही ऑनलाइन योग

कोरोनाच्या संकटातही ऑनलाइन योग

वाई : ‘योग हा माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनवला पाहिजे. योगामुळे आरोग्य निरोगी राहून रोग प्रतिकारशक्ती वाढते,’ असे मत ज्येष्ठ योग शिक्षक धनंजय मलटणे यांनी व्यक्त केले.

वाई तालुक्यात विविध ठिकाणी ऑनलाइन जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. योग दिनानिमित्त तालुक्यात विविध ठिकाणी योग दिनाचे आयोजन केले होते. या वेळी ते बोलत होते.

कोरोनाकाळातही जागतिक योग दिनानिमित्त शाळा, महाविद्यालयात, पतंजली समिती, आर्ट ऑफ लिव्हिंग सामाजिक संस्थांनी ऑनलाइन योगा केला. तर काही ठिकाणी योग साधकांनी सामाजिक अंतराच्या नियमांचे पालन करून तर अनेकांनी घरीच योग साधना करून योग दिवस साजरा केला. पतंजली योग समितीच्या वतीने सातारा जिल्ह्यात योग शिक्षकाच्या माध्यमातून नियमांचे पालन करून आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला. वाई येथे पतंजली योग समितीच्या वतीने सोशल डिस्टन्सचे पालन करून योग दिवस साजरा करण्यात आला.

निरोगी जीवन व्यतित करण्यासाठी नियमित योग, प्राणायाम करणे आज काळाची गरज आहे. भारतात योगसंस्कृती ही फार पूर्वीपासून चालत आली असून, योगसंस्कृती ही भारताने जगाला दिलेली देण आहे, असे उद्गार योग शिक्षक सुभाष यादव यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित आयोजित कार्यक्रमात योगाचे महत्त्व विषद करताना काढले. पतंजली योग समितीच्या वतीने जिल्हाभर कोरोनाच्या नियमांचे पालन करून योग दिवस साजरा केल्याची माहिती भारत स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष नीलेश पिसाळ यांनी दिली.

Web Title: Online yoga even in the crisis of the corona