लोधवडे प्राथमिक शाळेत ऑनलाईन योग दिवस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:26 IST2021-06-24T04:26:24+5:302021-06-24T04:26:24+5:30
सातारा : लोधवडे (ता. माण) येथील प्राथमिक शाळेच्या वतीने ऑनलाईन जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यामध्ये शिक्षक सतेशकुमार ...

लोधवडे प्राथमिक शाळेत ऑनलाईन योग दिवस
सातारा : लोधवडे (ता. माण) येथील प्राथमिक शाळेच्या वतीने ऑनलाईन जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. यामध्ये शिक्षक सतेशकुमार माळवे यांनी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने विविध प्रकारच्या योगासनांची माहिती देऊन त्यांच्याकडून विविध प्रकारच्या ऑनलाईन योग प्रात्यक्षिकांच्या कृती करून घेतल्या.
कोरोनाग्रस्त संकटकाळात मुलांच्या मानसिक आरोग्याचा विचार करून त्यांना प्रफुल्लित व आनंदी करणाऱ्या अनेक योगात्मक शारीरिक कृतीही घेण्यात आल्या. यावेळी विद्यार्थ्यांच्या मनाची एकाग्रता व मन:शांती वाढविणारे योग, प्राणायाम घेण्यात आले.
या आनंदी व आरोग्यदायी ऑनलाईन उपक्रमाचे कोकण विभागाचे माजी आयुक्त व सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, अनुराधा देशमुख, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मण पिसे, शिक्षण विस्ताराधिकारी सोनाली विभूते, संगीता गायकवाड, केंद्रप्रमुख नारायण आवळे, सरपंच आप्पासो जाधव, उपसरपंच वैशाली देशमुख, आदींनी कौतुक केले.
.............