आदर्श विद्यालयातर्फे आॅनलाइन छंदवर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:47 IST2021-06-09T04:47:42+5:302021-06-09T04:47:42+5:30
मलकापूर : येथील आदर्श विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विविध छंद वर्गांचे आॅनलाइन प्रशिक्षण घेण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘शाळा बंद शिक्षण ...

आदर्श विद्यालयातर्फे आॅनलाइन छंदवर्ग
मलकापूर : येथील आदर्श विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी विविध छंद वर्गांचे आॅनलाइन प्रशिक्षण घेण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ‘शाळा बंद शिक्षण चालू’ या उपक्रमानुसार विद्यार्थ्यांना मनोरंजनात्मक ज्ञान देऊन त्यांना समृद्ध करण्यासाठी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुख्याध्यापक सचिन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रकला, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू निर्मिती, सौंदर्यकृती, एरोबिक्स, वेदिक गणित, विज्ञानविषयक प्रयोग, मनोरंजनात्मक कोडी, बालगीत, बोधकथा, सुंदर हस्ताक्षर प्रशिक्षण आदी उपक्रम घेण्यात आले.
उरुल येथे विलगीकरण कक्ष सुरू
मल्हारपेठ : उरूल, ता. पाटण येथे ग्रामपंचायत व लोकसहभागातून वीस बेडचा विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आला आहे. येथील उपकेंद्रात सुरू झालेल्या या कक्षामुळे कोरोनाबाधित रुग्णांना दिलासा मिळाला आहे. तहसीलदार योगेश्वर टोम्पे यांच्या हस्ते या विलगीकरण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामपंचायत तसेच ठोमसे आणि बोडकेवाडीचे ग्रामस्थ तसेच दानशूरांच्या सहकार्याने सर्व सोयींनीयुक्त असे हे विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहे. या वेळी सरपंच वैशाली मोकाशी, माजी सरपंच संग्राम मोकाशी आदी उपस्थित होते.