कांद्यामुळं केलाय शेतकऱ्यांचा वांदा ! दर गडगडल्याने शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 12:46 AM2018-04-15T00:46:44+5:302018-04-15T00:46:44+5:30

Onions are farmers' walks! Farmers hustle with prices falling | कांद्यामुळं केलाय शेतकऱ्यांचा वांदा ! दर गडगडल्याने शेतकरी हवालदिल

कांद्यामुळं केलाय शेतकऱ्यांचा वांदा ! दर गडगडल्याने शेतकरी हवालदिल

Next
ठळक मुद्दे६०० रुपयांवर दर आल्याने कांदा उत्पादक अडचणीत

म्हसवड : माण तालुक्यातील नगदी पीक म्हणून कांदा पीक येथील शेतकरी घेत असतात; पण गेल्या वर्षापासून कांद्याच्या दरात सतत उतारामुळे बळीराजा अडचणीत सापडला आहे. उन्हाळी कांद्याचे दर गडगडल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाल्याचे चित्र दिसत आहे.

जून महिन्यात केलेल्या हळव्या कांद्याला चांगले दर मिळाल्याने बहुतांश शेतकरी वर्गाचा चांगला फायदा झाला होता. कांद्याचे दर भरमसाठ वाढल्याने कांदा उत्पादक शेतकºयांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागण केली होती. जून महिन्यापासून लागवड केलेला कांदा पीक अडीच महिन्यांत निघाल्यानंतर त्या कांद्याला चांगला दर मिळाल्याने अनेकांनी पुन्हा हळवा कांद्याची तर काहींनी उन्हाळी कांद्याची लागवड केली होती. त्याही कांद्याना चांगले दर मिळाले होते. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कांद्याचे चांगले दर टिकून होते; मात्र उशिरा लागण केलेले व विसकटलेले कांदे निघण्यास उशीर झाल्याने एकाच वेळी आवक वाढल्यामुळे कांद्याचे दर गडगडले. किमान दोन हजार रुपयांपर्यंत चाललेले दर अगदी पाचशे, सहाशेवर येऊन ठेपल्याने कांदा उत्पादक हवालदिल झाला आहे. अनेकांनी दर गडगडल्याने पोत्यात कांदे भरून निवाºयाला ठेवले आहेत. तर काहींनी कांद्याच्या ऐरणी लावल्या आहेत. चांगले दर आल्यानंतर ते विक्रीसाठी नेऊ शकतात; मात्र त्याची विक्री होईपर्यंत त्यात काही प्रमाणात घट निश्चित होत असते. तर अनेकांनी कांदे शेतातच झाकून ठेवून दर वाढण्याची प्रतीक्षा करत आहेत.

कांदे भरताना मजुरी, पिशवी, भाडे, काही प्रमाणात हमाली असे एकूण एका क्विंटलला २०० रुपयांवर खर्च येत असतो. या व्यतिरिक्त कांद्याला बियाणापासून, खते, शेतीची मशागत, भांगलणी, काढणी, काटणी, पाणी यासाठी केलेला खर्च वेगळाच आहे.


कांद्याला शासनाकडून किमान १,५०० रुपयाच्या वर हमीभाव मिळणे गरजेचे आहे. तरच शेतकरी वर्गाला कांदा पीक परवडणार आहे. आता कांद्याचे दर गडगडल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे.
- बाळासाहेब माने, शेतकरी,म्हसवड


कांद्याचे दर पडल्याने आम्ही साडेतीनशे पिशव्यांचे कांदे ऐरणी तयार करून त्यात ठेवले आहेत. १५ आॅगस्टच्या दरम्यान चांगले दर आले की त्या ऐरणी फोडून कांदे मार्केटला पाठवणार आहे.
- सोमनाथ कवी, म्हसवड

Web Title: Onions are farmers' walks! Farmers hustle with prices falling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.