शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

Satara: भरधाव कारच्या धडकेत एक महिला ठार, दोघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 18:56 IST

शाळेतून मुलांना आणायला निघाली असता काळाचा घाला

शिरवळ : भरधाव कारने दुचाकीसह एका पादचारी महिलेला जोराची धडक दिली. या अपघातात एक महिला जागीच ठार झाली. गंगामा बसवराज कितनुर (वय ३२, मूळ रा.बंगळुरू रा.कर्नाटक स. रा. फुलोरा सोसायटी, शिरवळ) असे मृत महिलेचे नाव आहे. तर कारचालकासह दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. लोणंद ते शिरवळ महामार्गावर शिरवळ गावच्या हद्दीत हा अपघात झाला.गणेश दिलीप भोईटे (३१) हे दुचाकी क्रमांक (एमएच-११-डीके-८३८३) ने पंढरपूर फाटा याठिकाणी निघाले होते. क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या पटांगणाजवळ आले असता लोणंदहून शिरवळकडे भरधाव वेगाने आलेल्या कार क्रमांक (एमएच -१२-टीएच-०३३७) ने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.दरम्यानच मुलांना शाळेतून आणण्यासाठी रस्त्यावर निघालेल्या पादचारी गंगामा कितनुर या महिलेलाही धडक दिली. यात महिला जागीच ठार झाली. अपघातात दुचाकीस्वार गणेश भोईटे, कारचालक प्रदिप ग्रामोपाध्याय (रा.कोथरूड,पुणे) हे गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तर जखमींना रुग्णालयात दाखल केले. कारचालक प्रदिप ग्रामोपाध्याय यांना अधिक उपचाराकरिता पुणे येथील हलविण्यात आले. मृत महिलेचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अपघाताची नोंद शिरवळ पोलीस स्टेशनला झाली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.