One murdered on the suspicion of mobile thieves | मोबाईल चोरल्याच्या संशयावरून एकाचा खून
मोबाईल चोरल्याच्या संशयावरून एकाचा खून

ठळक मुद्देमोबाईल चोरल्याच्या संशयावरून एकाचा खूनअज्ञात चौघांवर गुन्हा : फरारी आरोपीच्या शोधासाठी पथके रवाना

सातारा : मोबाईल चोरल्याच्या संशयावरून चौघाजणांनी एकाचा निर्घृण खून केल्याची घटना फलटण तालुक्यातील अलगुडेवाडी येथे शनिवारी दुपारी दोनच्या सुमारास घडली.

सान्या खत्याळ्या भोसले (वय ४५, रा. सरडे, ता. फलटण) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आकी सान्या भोसले (वय ४०) आणि सान्या भोसले हे दोघे पती पत्नी अलगुडेवाडी येथील विहिरीत शनिवारी दुपारी अंघोळ करत होते. यावेळी तेथे विहिरीवर काम करणारे चार कामगार आले.

तुम्ही आमचे मोबाईल चोरले आहेत. ते परत द्या, असे म्हणून चौघांनी आकी आणि सान्या यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत सान्या भोसले याचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी आकी भोसले ही सुद्धा गंभीर जखमी झाली. या घटनेनंतर मारहाण करणारे विहिरीवरील कामगार तेथून पसार झाले.

फलटण ग्रामीण पोलिसांनी चौघांवर खुनाचा आणि खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून, संशयित आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी पथके रवाना केली आहेत.


Web Title: One murdered on the suspicion of mobile thieves
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.