पाडेगावजवळ अपघातात एक ठार; आठ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 22:47 IST2018-12-09T22:47:08+5:302018-12-09T22:47:13+5:30

लोणंद : लोणंद-नीरा रस्त्यावर पाडेगावजवळील पेट्रोलपंपासमोर रविवारी दुपारी दोनच्या सुमारास दोन जीपची भीषण धडक बसली. यामध्ये एकजण ठार झाला ...

One killed in road accident near Padegaon; Eight injured | पाडेगावजवळ अपघातात एक ठार; आठ जखमी

पाडेगावजवळ अपघातात एक ठार; आठ जखमी

लोणंद : लोणंद-नीरा रस्त्यावर पाडेगावजवळील पेट्रोलपंपासमोर रविवारी दुपारी दोनच्या सुमारास दोन जीपची भीषण धडक बसली. यामध्ये एकजण ठार झाला असून, आठजण जखमी झाले. जखमींवर लोणंद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुलाब सत्तू हाके (वय ५५, रा. शेडगेवाडी) असे ठार झालेल्याचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी की, खंडाळा तालुक्यातील शेडगेवाडी येथील हाके परिवार आपल्या नातेवाइकांसह रविवारी बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथे नायकोबाच्या जत्रेला निघाले होते.
पाडेगाव हद्दीतील बागवान पेट्रोलपंपा समोर आले असताना समोरून भरधाव वेगाने आलेल्या जीपने (एमएच ४२ के ८७६६) ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात (एमएच १२ केपी ७६३८) या जीपला समोरून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, जीपने तीन पलटी खाल्ली. या अपघातात जीपमध्ये मागे बसलेले गुलाब सत्तू हाके यांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर आठजण जखमी झाले. तर इतर आठजण जखमी झाले. जखमींना तातडीने लोणंद येथील खासगी रुग्णालयात दाखल केले.
जखमी मंगल हाके (वय २८), तायडाबाई हाके (४८), रखमाजी हाके (६०), जयश्री हाके (४५), दीपाली कोंडिबा हाके (३०), बाळू विठू हाके (७०), सुधांशू धोंडिबा हाके (८), रेश्मा हिंदुराव हाके (२६) यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या अपघाताची नोंद लोणंद पोलीस ठाण्यात करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर तपास करीत आहेत.

Web Title: One killed in road accident near Padegaon; Eight injured