‘आमच्या गल्लीतील मुलीची छेड का काढतो?, फलटणमध्ये एकाचा खून; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2022 04:16 PM2022-01-13T16:16:40+5:302022-01-13T16:34:23+5:30

‘आमच्या गल्लीतील मुलीची छेड का काढतो?’ असा जाब विचारात केली तलवार, लोखंडी पाइप व लाकडी दांडक्याने मारहाण

One killed in Phaltan beating, Charges filed against six persons | ‘आमच्या गल्लीतील मुलीची छेड का काढतो?, फलटणमध्ये एकाचा खून; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

‘आमच्या गल्लीतील मुलीची छेड का काढतो?, फलटणमध्ये एकाचा खून; सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

Next

फलटण : ‘आमच्या गल्लीतील मुलीची छेड का काढतो?’ असा जाब विचारात सहाजणांनी पवार गल्ली, फलटण येथील निलेश चव्हाण व भरत फडतरे यांना तलवार, लोखंडी पाइप व  लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले होते. यामध्ये निलेश चव्हाण मयत झाला असून, सहाजणांच्या विरोधात खून, जीवे मारण्याचा प्रयत्न व आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, फलटण येथे श्रीराम मंदिराजवळ, श्रीराम पोलीस चौकीसमोर काल, बुधवार, (दि.१२) रोजी दुपारी पावणे चारच्या सुमारास निलेश हिरालाल चव्हाण (छोटा मचली) व त्याचा मित्र भरत फडतरे (रा. मलटन, फलटण) यांना ‘आमच्या गल्लीतील मुलींची छेड का काढतो?’ असे म्हणून सलिम शेख यांनी लोखंडी तलवारीने तर त्यांची मुले सैफुला सलिम शेख व जमिर सलिम शेख (सर्व रा. कुंभारटेक, फलटण) यांनी लोखंडी पाईपने तर बिलाल व राज बागवान आणि एक अनोळखी इसम यांनी लाकडी दांडक्याने मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी देवून, गंभीर जखमी केले. 

या मारहाणीत निलेश चव्हाण हा उपचार सुरू असताना मयत झाला आहे. तसेच भरत फडतरे गंभीर जखमी झाला. त्याच्यावर बारामती येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची फिर्याद मयत निलेशची आई कांता हिरालाल चव्हाण यांनी दिली आहे. पोलीस निरीक्षक भारत केंद्रे तपास करत आहेत.

Web Title: One killed in Phaltan beating, Charges filed against six persons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.