अज्ञात वाहनाच्या धडकेत शिरवळजवळ एक ठार

By Admin | Updated: January 12, 2015 01:09 IST2015-01-12T01:09:02+5:302015-01-12T01:09:02+5:30

उपचारांदरम्यान मृत्यू

One killed near a Shirwal near an unknown vehicle | अज्ञात वाहनाच्या धडकेत शिरवळजवळ एक ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत शिरवळजवळ एक ठार

शिरवळ : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील शिरवळ (ता. खंडाळा) गावाच्या हद्दीत अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत महामार्ग ओलांडणाऱ्या पादचाऱ्याचा मृत्यू झाला. रवींद्र विठ्ठल पोमन (वय ३८, रा. पिंपळे, ता. पुरंदर, जि. पुणे) असे त्यांचे नाव आहे.
याबाबत शिरवळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरवळजवळ जोगळेकर हॉस्पिटलनजीक महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करीत असलेले रवींद्र पोमन यांना काल, शनिवारी रात्री उशिरा अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. त्यामध्ये पोमन गंभीर जखमी झाले. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
शिरवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
या घटनेची नोंद शिरवळ पोलीस दूरक्षेत्रात झाली असून, हवालदार रवींद्र कदम अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: One killed near a Shirwal near an unknown vehicle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.