विनयभंगप्रकरणी एकास सक्तमजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:09 IST2021-01-08T06:09:00+5:302021-01-08T06:09:00+5:30
राजदीप प्रभाकर रोकडे (रा. नानेगाव खुर्द, ता.पाटण) असे शिक्षा झालेल्याचे नाव असल्याची माहिती सरकारी वकीस मिलिंद कुलकर्णी यांनी पत्रकाद्वारे ...

विनयभंगप्रकरणी एकास सक्तमजुरी
राजदीप प्रभाकर रोकडे (रा. नानेगाव खुर्द, ता.पाटण) असे शिक्षा झालेल्याचे नाव असल्याची माहिती सरकारी वकीस मिलिंद कुलकर्णी यांनी पत्रकाद्वारे दिली. सरकारी वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजदीप रोकडे याने विनयभंग केल्याची फिर्याद उंब्रज पोलीस ठाण्यात दिली होती. या गुन्ह्याचा तपास करून उंब्रज पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्यानुसार जिल्हा व सत्र न्या. एस. ए. ए. आर. औटी यांच्यासमोर खटल्याची सुनावणी सुरू होती. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील मिलिंद कुलकर्णी यांनी महत्त्वाचे सात साक्षीदार तपासले. सरकारी वकील मिलिंद कुलकर्णी यांचा युक्तिवाद ग्राहय धरुन आरोपीस दोषी धरून न्यायालयाने दोन महिने सक्तमजुरी व पाचशे रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.