एकीकडे नववर्षाचे स्वागत...दुसरीकडे जाळपोळ!

By Admin | Updated: January 1, 2017 14:01 IST2017-01-01T14:01:23+5:302017-01-01T14:01:23+5:30

वर्षाच्या स्वागतामध्ये एकीकडे सर्वजण मग्न असतानाच दुसरीकडे मात्र अज्ञातांनी चार मोटारसायकलींची जाळपोळ केली.

On one hand welcome new year ... arson on the other! | एकीकडे नववर्षाचे स्वागत...दुसरीकडे जाळपोळ!

एकीकडे नववर्षाचे स्वागत...दुसरीकडे जाळपोळ!

लोकमत आॅनलाईन

सातारा, दि. 1 - वर्षाच्या स्वागतामध्ये एकीकडे सर्वजण मग्न असतानाच दुसरीकडे मात्र अज्ञातांनी चार मोटारसायकलींची जाळपोळ केली. येथील व्यंकटपुरा पेठेमध्ये मध्यरात्री हा प्रकार घडला. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, व्यंकटपुरा पेठेमध्ये लखन गोसावी हे राहातात. शनिवारी रात्री दीडच्या सुमारास त्यांच्या घरासमोर लावलेल्या चार मोटारसायकली अज्ञाताने पेट्रोल ओतून जाळल्या. हा प्रकार पहाटे तीनच्या सुमारास काही नागरिकांच्या निदर्शनास आला. त्यानंतर शाहूपुरी पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिस आल्यानंतर व्यंकटपुरा पेठेमध्ये इतरत्र त्यांनी शोध घेतला. मात्र कोणीच सापडले नाही. लखन गोसावी यांचा यापूर्वी कोणासोबत वाद झाला होता का, याची पोलिस चौकशी करत आहेत. पूर्ववैमनस्यातून कोणी तरी हा प्रकार केला असावा, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. यामध्ये गोसावी यांचे सुमारे दीड लाखांचे नुकसान झाले आहे. या घटनेची शाहूपुरी पोलिस ठाण्यात अद्याप नोंद झाली नव्हती. (प्रतिनिधी)

Web Title: On one hand welcome new year ... arson on the other!