एकीकडे लोकांची हत्या दुसरीकडे अनाथांना दत्तक !

By Admin | Updated: August 20, 2016 22:50 IST2016-08-20T22:45:50+5:302016-08-20T22:50:50+5:30

आणखी एक नाटक : काळी प्रतिमा बदलण्यासाठी संतोषचा नवा सोशल फंडा; आश्रमाकडून नकार

On one hand, killing of people on the other hand, orphans adopted! | एकीकडे लोकांची हत्या दुसरीकडे अनाथांना दत्तक !

एकीकडे लोकांची हत्या दुसरीकडे अनाथांना दत्तक !

दत्ता यादव --सातारा -एकापाठोपाठ एक खून करून रक्ताने डागाळलेल्या हातावरील कलंक कायमचे पुसायचे असतील तर समाजात प्रतिष्ठा मिळवायलाच हवी. हे चांगले ठाऊक असलेल्या संतोष पोळचे आता अनेक किस्से समोर येत आहेत. स्वत:ची काळी प्रतीमा पुसण्यासाठी अनाथ मुले दत्तक घेऊन समाजात त्याला सहानुभूतीचे स्थान निर्माण करायचे होते.
अनाथ मुले दत्तक घेण्याची प्रक्रिया कशी असते, याची माहिती घेण्यासाठी त्याने पुणे आणि सातारा येथील जिल्हाधिकारी कार्यालयात खेटे मारल्याचे समोर येत आहे.
संतोषने थंड डोक्याने सहाजणांना यमसदनी धाडले. त्यामुळे त्याचा पूर्व इतिहास कसा होता, त्याच्या संपर्कात कोण-कोण होते. त्याला भविष्यात काय करायचे होते, असे अनेक औत्सुक्याचे विषय सध्या चर्चेला जात आहेत. त्यातूनच संतोष पोळच्या विकृतीचा खजिना जगासमोर येत आहे. मात्र आपण ज्यांना दुखावले आहे. त्या लोकांकडून एक ना एक दिवस आपली काळी कृत्ये उघड होतील, याचीही त्याला सातत्याने भीती वाटत होती. त्यामुळे आत्तापर्यंत जे झालं ते झालं, असं समजून पोळने समाजात सहानुभूती मिळविण्यासाठी ‘अनाथांचा आसरा’ घेण्याचा निर्णय घेतला होता.
या मुलांचा सांभाळ केल्यानंतर साहजिकच लोकांचा बघण्याचा दृष्टिकोनही बदलेल, या विचाराने त्याने अनाथ मुले दत्तक घेण्यासाठी जी काय प्रक्रिया आहे. त्याची माहिती घेण्यास सुरुवात केली.
जिल्ह्यातील एका अनाथ आश्रमामध्ये जाऊन त्याने मुले दत्तक घ्यायची इच्छाही व्यक्त केली होती. मात्र अनाथ आश्रममधील मुले सहजासहजी दत्तक देता येत नाहीत, याची प्रक्रिया प्रचंड किचकट आहे, असे त्याला सांगण्यात आले. त्यामुळे त्याने पुण्यात जाऊनही माहिती घेतली होती.

Web Title: On one hand, killing of people on the other hand, orphans adopted!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.