शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
4
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
5
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
6
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
7
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
8
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
9
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
10
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
11
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
12
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
13
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
14
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
15
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
16
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
17
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
18
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
19
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
20
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा

पॉलिशचा एक बहाणा पचला.. दुसरा पोलिसांपर्यंत पोहोचला; बिहारचा तरुण साताऱ्यात अटकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 17:18 IST

पॉलिश करत असताना या दोघांनी हातचलाखी करून काही सोने काढून घेतले. त्यानंतर दोघे तेथून निघून गेले.

सातारा : सोन्याचे दागिने पॉलिश करून देतो, असे सांगून दोघांनी महिलेला गंडवलं. एवढेच नव्हे तर दागिने घेऊन त्यांनी पलायन केलं खरं पण एक बहाणा पचण्यापूर्वीच त्यांचा दुसरा साथीदार पोलिसांच्या हाती लागला. यामुळे यापूर्वी या दोघांनी केलेले अनेक बहाणे आता उघडकीस येणार आहेत. पोलिसांनी अटक केलेला तरूण बिहारचा असल्याचे समोर आले आहे.सोन्याचे दागिने, भांडी, चांदी अशा प्रकारच्या वस्तू पॉलिश करून देतो, असे सांगत अनेकजण फिरत असतात. विश्वास संपादन केल्यानंतर हातचलाखी करून दागिने घेऊन संबंधित टोळकं पसार होत होतं. दागिन्यांना पाॅलिश करून देतो, असे बहाणे सांगून यापूर्वी बऱ्याच महिलांना लुटण्यात आलंय. अशा प्रकारच्या बहाण्याचा गुन्हा आत्तापर्यंत उघडकीस आला नव्हता. मात्र, सातारा शहर पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण शाखेला हा गुन्हा उघडकीस आणण्यात यश आले.गोडोलीतील लता पाटील यांच्या घराजवळ काही दिवसांपूर्वी दोन युवक आले. त्या युवकांनी पितळ, चांदी पॉलिश करून देतो, असे सांगितले. पाटील यांनी त्यांना चांदीचे ताट व तांब्याचा कलश दिला. ही दोन्ही भांडी त्या दोघांनी पॉलिश करून अगदी चकाचक केली. त्यामुळे पाटील यांचा विश्वास बसला. त्यांनी सोन्याच्या ४० ग्रॅमच्या चार बांगड्या त्या दाेघांजवळ पॉलिश करण्यासाठी दिल्या. या बांगड्यांना पॉलिश करत असताना या दोघांनी हातचलाखी करून काही सोने काढून घेतले. त्यानंतर दोघे तेथून निघून गेले.परंतू काही वेळानंतर हे दागिने वजनाला हलके वाटत असल्याचे पाटील यांना शंका आली. त्यांनी तातडीने सराफाच्या दुकानात जाऊन खातरजमा केली असता सोने १२ ग्रॅमने कमी झाल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.पोलिसांनी दोघा आरोपींचा शोध सुरू केला. तेव्हा त्यांना कऱ्हाडमध्ये एकजण असल्याचे समजले. पोलिसांनी तेथे जाऊन राहुल अजयकुमार साह (वय २०, रा. बिहार) याला ताब्यात घेतले. त्याला साताऱ्यात आणल्यानंतर त्याने आपला आणखी एक साथीदार असून, तो सध्या पसार झाला आहे. आम्ही दोघांनी मिळून हा गुन्हा केलाच शिवाय सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यातही अनेक गुन्हे केल्याची कबुली त्याने दिली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक समीर कदम, पोलीस नाइक सुजीत भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतीराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे आदींनी केली.

एका जिल्ह्यात एकच गुन्हा..

दागिन्यांना पाॅलिश करून देतो, असे सांगून महिलांना लुटणारे हे दोघे एका जिल्ह्यात एकच गुन्हा करत होते. त्यानंतर ते दुसऱ्या जिल्ह्यात जात होते. त्यामुळे ते पोलिसांना सापडत नव्हते. राहण्याचा पत्ताही सातत्याने बदलत होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारी