शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
3
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
4
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
5
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
6
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
7
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
8
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
9
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
10
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
11
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
12
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
13
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
14
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
15
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
16
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
17
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
18
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
19
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
20
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल

देवदर्शनला जाताना लक्झरी बसला अपघात; एकाचा मृत्यू, दहा जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 19:36 IST

सातारा-लोणंद रस्त्यावरील घटना

वाठार स्टेशन/आदर्की : लोणंद-सातारा रस्त्यावर निष्णाई पेट्रोल पंपाजवळ लक्झरी बस आणि ट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर तीन प्रवासी गंभीर जखमी झाले असून दहा प्रवासी किरकोळ जखमी झाले. हा अपघात रविवारी सकाळी सहा वाजता झाला. सर्व प्रवाशी उत्तर भारतात देवदर्शनाला निघाले होते. अपघातातील जखमींच्या मदतीसाठी स्थानिक लगेचच घटनास्थळी दाखल झाले. त्यामुळे सध्या लुप्त होत चाललेल्या माणसुकीचं दर्शन घडलं. कोल्हापूर, इस्लामपूर, मनेराजुरी, बोरगाव, उंब्रज, कोरेगाव आदी परिसरातील चाळीस जण लक्झरी बसने २८ दिवसांसाठी उत्तर भारतात देवदर्शनासाठी निघाले होते. कोल्हापूरहून निघालेली बस वाठार स्टेशन येथील पेट्रोल पंपाजवळ येताच भरधाव ट्रकची आणि लक्झरी बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, लक्झरी बसचे केबिन ट्रकच्या केबिनमध्ये अडकले. ट्रक चालक विजय बाबूराव वैरागर (रा.केडगाव चौफुला) स्टेरिंगच्या रॉड आणि बोनेटमध्ये अडकला. त्याच्या उजव्या पायाला गंभीर जखम झाली. पोलीस आणि ग्रामस्थांनी प्रयत्नांची शिकस्त करत जेसीपी आणि ट्रॅक्टरच्याद्वारे दोन्ही वाहने वेगळी करून त्याला बाहेर काढले. या अपघातात सागर कमाने गंभीर जखमी झाला. त्याला रक्तबंबाळ अवस्थेत बाहेर काढण्यात आल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ट्रक चालकासह अन्य दहा प्रवाशांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींमध्ये शांताबाई पांडुरंग घाडगे (रा.बोरगाव), वैजंता तानाजी पवार (रा.मनेराजुरी), शोभाताई मनोहर कुंभार ( रा. मळणगाव), आक्काताई सदाशिव कुंभार ( रा. मळणगाव), आशिष कुमार केदार मल्लाप्पा (रा.मुळशी), प्रभावती बाबुराव कुंभार ( रा.मळणगाव), तानाजी दत्तू पवार (रा.मनेराजुरी), रजनीकांत कैलास कांबळे (लक्झरी चालक रा.कोल्हापूर), अनिल किसन शिंदे,  वैजंता जगन्नाथ जाधव (रा.उंब्रज) या प्रवाशांचा समावेश आहे.अपघाताची माहिती समजतात वाठार पोलीस स्टेशनचे सपोनि मारुती खेडकर व त्यांचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांच्या व ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णवाहिकेने सातारा येथे नेण्यात आले. अपघातस्थळी जमलेल्या आजूबाजूच्या गावातील लोकांनी व इतर ट्रक चालकांनी मदतकार्य केले. खरोखरच माणुसकीचे दर्शन घडल्याचे पाहायला मिळाले. या अपघातामुळे वाहतूक ठप्प झाली होती. अखेर पर्याय म्हणून माळरानातून बैलगाडीच्या रस्त्यावरून वाहतूक सुरू करण्यात आली. 

टॅग्स :Accidentअपघात