दुचाकीच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:44 IST2021-05-25T04:44:24+5:302021-05-25T04:44:24+5:30

फलटण : फलटण ते आसू रस्त्यांवर राजाळे गावच्या हद्दीत समोरासमोर झालेल्या दोन मोटारसायकल धडकेत एकजण जागीच ठार दोघे जखमी ...

One died on the spot in a two-wheeler collision | दुचाकीच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

दुचाकीच्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू

फलटण : फलटण ते आसू रस्त्यांवर राजाळे गावच्या हद्दीत समोरासमोर झालेल्या दोन मोटारसायकल धडकेत एकजण जागीच ठार दोघे जखमी झाले. याप्रकरणी तिघाजणांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. विजय नानासाहेब भोईटे असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

फलटण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहित राज भोहिटे (रा. राजाळे ता. फलटण) यांंनी दिलेल्या फिर्यादीनुसार, फलटण ते आसू रस्त्यावर राजाळे गावच्या हद्दीत सांडभोर पोर्टी फार्मसमोर रविवारी (दि. २३) रात्री अकराच्या दरम्यान विजय नानासाहेब भोईटे (वय ४५, रा. राजाळे ता. फलटण) हे दुचाकी (एमएच ११ सीयु ४५७५) वरुन राजाळेकडून फलटणकडे येत होते. तेव्हा फलटणकडून राजाळेकडे जाणारी दुचाकी (एमएच ११ सीझेड १८३४) वरील चालक प्रशिक अविनाश अहिवळे यांने ट्रिपल सीट भरधाव वेगाने गाडी आणली. रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष करून रस्त्याचे चुकीच्या बाजूने जावून भोईटे यांना जोराची धडक दिली. यामध्ये भोईटे यांचा मृत्यू झाला. तसेच त्याच्या पाठीमागे बसलेल्या अजय रमेश अहिवळे व आकाश प्रकाश काकडे (दोन्ही रा. मंगळवा रपेठ फलटण) हेही जखमी झाले. असून अधिक तपास पोलीस हवालदार सावंत करत आहेत.

Web Title: One died on the spot in a two-wheeler collision