शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

वाघनख्यांच्या तस्करीप्रकरणी एकास अटक- पाच लाखांच्या दोन नख्या जप्त, वडगाव हवेलीत कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 23:06 IST

वाघनख्यांची तस्करी करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली, तर अल्पवयीनास ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पाच लाख रुपये किमतीच्या नख्यांसह इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

ठळक मुद्देअल्पवयीन ताब्यात, दोघेजण वाघनख्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती

कऱ्हाड : वाघनख्यांची तस्करी करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली, तर अल्पवयीनास ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून पाच लाख रुपये किमतीच्या नख्यांसह इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई कऱ्हाड तालुक्यातील वडगाव हवेली येथे शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक कार्यालयाच्या पथकाने केली.

अवधूत जगदीश जगताप (वय १८, रा. खुबी, ता. कºहाड) असे अटक केलेल्या युवकाचे नाव आहे, तर त्याच्या अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेतले आहे. दरम्यान, वाघनख्यांच्या तस्करीत आणखी काहीजणांचा हात असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार पोलीस तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव हवेली हद्दीतील पेट्रोल पंपाजवळ दोघेजण वाघनख्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती शुक्रवारी रात्री सातच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांना मिळाली. त्यानुसार उपअधीक्षक ढवळे यांनी पोलीस उपनिरीक्षक अशोक भापकर यांच्यासह कॉन्स्टेबल सागर बर्गे, हवालदार बी. आर. जगदाळे, ए. आर. जमादार, पी. पी. पवार, सौरभ कांबळे, कॉन्स्टेबल रमेश बरकडे या कर्मचाºयांचे पथक तयार करून संबंधित ठिकाणी सापळा रचला.

पोलीस पथक सायंकाळी पेट्रोल पंप परिसरात साध्या वेशामध्ये पोहोचले. रात्रीच्या सुमारास दुचाकीवरून दोघेजण त्याठिकाणी आले. पंपापासून काही अंतरावर दुचाकी थांबवून ते दोघे मोबाईलवर बोलत होते. पोलिसांना संशय आल्यामुळे साध्या वेशातील दोन कर्मचारी त्याठिकाणी गेले. त्यांनी संबंधित दोघांशी वाघनख्यांच्या विक्रीबाबत चौकशी सुरू केली. त्यावेळी संशयितांनीही नख्यांची किंमत सांगत सतरा हजार रुपयांत नख्या विकण्याचे कबूल केले. त्यांनी नख्या काढून दाखविल्यानंतर सापळा रचून आसपास थांबलेल्या इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता दोन धारदार चाकूही त्यांच्याकडे आढळून आले. पोलिसांनी वाघनख्या, चाकू तसेच गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत केली आहे.

या गुन्ह्यात अवधूत जगताप याला पोलिसांनी अटक केली आहे, तर त्याच्या अल्पवयीन साथीदारास ताब्यात घेण्यात आले आहे. कारवाईनंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनाही याबाबतची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. त्यावेळी वनाधिकाºयांनीही भेट देऊन वाघनख्यांची पाहणी केली. या नख्यांची किंमत पाच लाखांपर्यंत असावी, असे वनाधिकाºयांनी स्पष्ट केले.संपर्क कुणाशी केला?पेट्रोल पंपाजवळ पोहोचल्यानंतर दोन्ही संशयित वारंवार मोबाईलवरून कोणाशी तरी संपर्क साधत होते. त्या मोबाईलवर बोलणाऱ्यांपर्यंत पोलीस अद्याप पोहोचू शकलेले नाहीत. ज्यांच्याशी संशयित संपर्क साधत होते ती व्यक्ती कदाचित नख्यांची खरेदी करण्यासाठी येणार असावी, असा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे पोलीस त्यादृष्टीने तपास करीत आहेत.मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यतावाघनख्यांची तस्करी एक-दोन मुले करू शकत नाहीत. यामागे मोठी टोळी कार्यरत असावी, असा पोलिसांना संशय आहे. या वाघनख्या कोठून आणल्या? वाघाची शिकार नेमकी कुठे आणि कुणी केली? याचा सध्या पोलीस तपास करीत आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी काहीजणांना अटक होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliceपोलिस