औद्योगिक वसाहतीतील कंपनीतून दीड लाखाचा ऐवज चोरीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:38 IST2021-05-16T04:38:37+5:302021-05-16T04:38:37+5:30
सातारा : सातारा येथील नवीन औद्योगिक वसाहतीतील परांजपे अॅटोकास्टमधून अॅल्युमिनियम कास्टिंगचे ३३ बॉक्स चोरीला गेले आहेत. याची किंमत १ ...

औद्योगिक वसाहतीतील कंपनीतून दीड लाखाचा ऐवज चोरीस
सातारा : सातारा येथील नवीन औद्योगिक वसाहतीतील परांजपे अॅटोकास्टमधून अॅल्युमिनियम कास्टिंगचे ३३ बॉक्स चोरीला गेले आहेत. याची किंमत १ लाख ४१ हजार रुपये आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून पोलिसांनी अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा येथील नवीन औद्योगिक वसाहतीत परांजपे अॅटोकास्ट प्रा. लि. कंपनी आहे. कंपनीच्या मशीन शॉपमध्ये प्रवेश करून कोणीतरी अज्ञात चोरट्याने खाकी रंगाच्या पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये भरलेले अॅल्युमिनियम कास्टिंगचे ३३ बॉक्स चोरुन नेले. याची किंमत १ लाख ४१ हजार ५५० रुपये इतकी आहे. याप्रकरणी परांजपे अॅटोकास्ट प्रा. लि. मधील अधिकारी समीर मोकाशी (वय ३३) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी हवालदार भोसले हे तपास करीत आहेत.