जुन्या बंधाऱ्यांनाच मलमपट्टी!
By Admin | Updated: July 10, 2015 00:38 IST2015-07-09T21:24:38+5:302015-07-10T00:38:27+5:30
लघु पाटबंधारेचा प्रताप : निकृष्ट दर्जाच्या कामामुळे गळती--पाणी अडवा पाणी जिरवा

जुन्या बंधाऱ्यांनाच मलमपट्टी!
सूर्यकांत निंबाळकर - आदर्की -फलटण तालुक्याचा दु्ष्काळी भागात १९८२ मध्ये के. टी. वेअर बंधारे दगडाचे बांधले. त्यामध्ये गाळ व पडझड झाल्याने शासनाकडून निधी उपलब्ध होवून जुने बंधारे दुरुस्त केले. पण निकृष्ट दर्जाच्या कामामुळे जुन्याचं नवं केला पण सिमेंट बंधारे पाण्यात गेल्याची चर्चा सुरु आहे. फलटण पश्चिम भागात बहुतांशी ओढ्यावर आदर्की-हिंगणगाव, सासवड, आळजापूर, बिबी-घाडगेवाडी-आदर्की बु।।-कापशी आदी ओढ्यावर १९८२ च्या दरम्यान के.टी. वेअर बंधारे मोठ्या प्रमाणात बांधले. त्याचा फायदाही झाला पण लघु पाटबंधारेची दुर्लक्षामुळे बंधाऱ्यात गाळ साठला तर काहींची पडझड झाली. शासनाने जुन्या बंधाऱ्याची दुरुस्ती करण्याचा निर्णय घेऊन प्रत्येक बंधारा दुरुस्त करण्यासाठी ३ ते ५ लाख रुपये निधी दिला. परंतु एका बंधाऱ्यावर दोन वेळा निधी खर्चूनही त्याला गळतीच राहिली. उन्हाळ्यात या बंधाऱ्यात धोम-बलकवडीचे तीनवेळा पाणी सोडले. पण पंधरा दिवसात बंधारे कोरडे पडत आहे. आता मे ते जून महिन्यात पाऊस पडला. परंतु बंधाऱ्यात पाणी साठा झाला नाही. त्यामुळे बंधारेवार दोन वेळा खर्च होऊनही पाणीसाठा होत नसल्याने पाटबंधारे विभागामार्फत होण्याच्या बंधाऱ्याची पहाणी करावी.