अडीच वर्षांनंतर ग्रामीण विकासला अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:47 IST2021-09-10T04:47:47+5:302021-09-10T04:47:47+5:30
सातारा : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पद अडीच वर्षांपासून रिक्त होते. आता या पदावर एस. वाय. देसाई ...

अडीच वर्षांनंतर ग्रामीण विकासला अधिकारी
सातारा : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पद अडीच वर्षांपासून रिक्त होते. आता या पदावर एस. वाय. देसाई यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे इतर अधिकाऱ्याकडील अतिरिक्त पदभाराची जबाबदारी संपणार आहे. तर जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारीपदी एम. एस. घुले यांची नियुक्ती झाली आहे.
जिल्हा परिषदेतील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांच्याकडे होता. गेल्या दीड वर्षापासून ते कामकाज सांभाळत होते. सध्या त्यांची बदली झाली आहे; तर ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकपदी एका अधिकाऱ्याची दीड वर्षापूर्वी नियुक्ती झालेली. पण, ते हजर झाले नव्हते. त्यामुळे ग्रामीण विकास यंत्रणेचा कारभार इतर अधिकारीच पाहत होते. आता एस. वाय. देसाई यांची नियुक्ती शासनाने केली आहे. देसाई या कोल्हापूर येथे ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्रात प्राचार्या म्हणून कार्यरत होत्या.
दरम्यान, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांची १० दिवसांपूर्वी सोलापूरला बदली झाली. त्यांच्या जागी आता एम. एस. घुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. घुले हे सध्या पुणे जिल्हा परिषदेत सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते; तर घुले यांनी यापूर्वीही सातारा जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे.
...........................................................