कॉंग्रेसचा संघाच्या कार्यावरील आक्षेप म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:39 IST2021-05-12T04:39:51+5:302021-05-12T04:39:51+5:30

पत्रकात म्हटले आहे की, पहिल्या लाटेत कोरोना हॉटस्पॉट म्हणून गणल्या जाणाऱ्या धारावी तसेच पुणे यांसारख्या ठिकाणी संघ स्वयंसेवक ...

The objection of the Congress to the work of the Sangh is a form of spitting on the sun | कॉंग्रेसचा संघाच्या कार्यावरील आक्षेप म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार

कॉंग्रेसचा संघाच्या कार्यावरील आक्षेप म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार

पत्रकात म्हटले आहे की, पहिल्या लाटेत कोरोना हॉटस्पॉट म्हणून गणल्या जाणाऱ्या धारावी तसेच पुणे यांसारख्या ठिकाणी संघ स्वयंसेवक स्वतः प्राणांची पर्वा न करता स्वयंस्फूर्तीने टेस्टिंग, ट्रेसिंग करत होते. यादरम्यान कित्येक स्वयंसेवकांना प्राणासदेखील मुकावे लागले. अशा परिस्थितीत कराडसारख्या ठिकाणीदेखील वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय प्रशासनाची रीतसर परवानगी घेऊन लसीकरण केंद्रावर तीन दिवस स्वयंसेवक रुग्णालय प्रशासनाला मदत करत होते.

संघ स्वयंसेवक स्वतःचा जीव धोक्यात घालून गर्दी नियंत्रण, नाव नोंदणी, ज्येष्ठ नागरिकांना सहकार्य यांसारख्या कार्यात प्रशासनास मदत करत होते. नागरिकदेखील या निःस्वार्थी कार्याची मुक्तकंठाने स्तुती करत आहेत. अशा परिस्थितीत काही राजकीय पुढारी संघाची बदनामी करायचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.

नागरिकांशी वाद झाल्याचा बनाव करून निःस्वार्थी सेवाकार्य थांबविण्याच्या उद्देशाने संघाला टार्गेट करायचा प्रकार आहे. वास्तविक ज्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय आपत्तीवेळी सहकार्याच्या ऐवजी भूमिगत झाले. अशा पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून दुसऱ्या काय अपेक्षा करणार? कोरोना काळात जनसेवेसाठी रस्त्यावर उतरण्याऐवजी घराचे दरवाजे बंद करणाऱ्यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता निःस्वार्थी काय करणाऱ्या संघाच्या कार्यावर आक्षेप म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे.

तक्रार करून कार्य बंद पाडण्याचा हेतू साध्य करणाऱ्यांनी आज उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन नियोजनाअभावी झालेली दुरवस्था नक्कीच पाहावी. फिजिकल डिस्टन्सिंगचा उडालेला फज्जा, लसीकरण केंद्रावरचा सावळागोंधळ नजरेखालून आवर्जून घालावा, असा चिमटाही पावसकर यांनी विरोधकांना काढला आहे.

Web Title: The objection of the Congress to the work of the Sangh is a form of spitting on the sun

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.