भरतगाववाडी येथे पोषण आहार अभियान कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:37 IST2021-03-28T04:37:11+5:302021-03-28T04:37:11+5:30
नागठाणे : परिसरातील भरतगाववाडी येथे पोषण आहार अभियान कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत भरतगाववाडी (ता. सातारा) ...

भरतगाववाडी येथे पोषण आहार अभियान कार्यक्रम
नागठाणे : परिसरातील भरतगाववाडी येथे पोषण आहार अभियान कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. एकात्मिक बालविकास प्रकल्पांतर्गत भरतगाववाडी (ता. सातारा) येथे शेंद्रे बिटमधील अंगणवाडी सेविकांमार्फत पोषण रॅली काढून तसेच बेटी ‘बचाव, बेटी पढाव’ अभियानांतर्गत गावातील नागरिकांना संदेश देऊन शासनाचे योजनेचा प्रसार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेंद्रे जिल्हा परिषद गटाचे सदस्य प्रा. शिवाजीराव चव्हाण तसेच जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, सहायक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विलासराव घाडगे, गावचे उपसरपंच सुभेदार संपतराव मोहिते आदी प्रमुख उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने मान्यवरांच्या हस्ते मुलीच्या जन्माचे स्वागताबरोबरच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सेविकांनी बनवलेल्या पोषण आहार प्रात्यक्षिक पदार्थांचे मान्यवरांच्या उपस्थितीत पाहणी करून कौतुक करण्यात आले. प्रास्ताविक भाषणात पर्यवेक्षिका कणसे यांनी वर्षभर समुदाय आधारित कार्यक्रमाची माहिती देऊन पोषण आहार हे केवळ अभियान नसून एक लोकचळवळ आहे व यातून निरोगी समाज निर्माण होणेसाठी आवश्यक असल्याचे सांगितले. ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ अभियानांतर्गत विविध रांगोळ्यांचे प्रदर्शन पाहून मान्यवरांच्या सोबत नागरिकांनी प्रशंसा केली. आपल्या अध्यक्षीय भाषणात चव्हाण यांनी मुलीच्या जन्माचे महत्त्व सांगून आहारविहारविषयक व्यायाम आणि दैनंदिन जीवनातले महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे मुख्याध्यापक भरत मोजर यांनी सूत्रसंचालन केले. सुनील शेडगे यांनी आभार केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस तसेच शिक्षक आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.