जावळीत मंदावलेला कोरोनावाढीचा आकडा पुन्हा वाढतोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:26 IST2021-06-20T04:26:19+5:302021-06-20T04:26:19+5:30
कोरोनाच्या तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असल्याची माहिती माध्यमांतून वारंवार देण्यात येत आहे. अशातच कोरोनाची बाधा आता लहान ...

जावळीत मंदावलेला कोरोनावाढीचा आकडा पुन्हा वाढतोय
कोरोनाच्या तिसरी लाट ही लहान मुलांसाठी धोकादायक असल्याची माहिती माध्यमांतून वारंवार देण्यात येत आहे. अशातच कोरोनाची बाधा आता लहान मुलांना होत असल्याचे पाहायला मिळत आहे. जावळी तालुक्यातील तेरा मुलांचा कोरोना अहवाल बाधित आल्याने आता काळजी वाढली आहे. सर्वांनीच याबाबत दक्षता घेणे आवश्यक आहे. नवीन वर्षातील शाळाही ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. तरीही काही भागातील मुले बाहेर एकत्र खेळत असतात. त्यामुळेही संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
चौकट :
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न
जावळीच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून नेवेकरवाडीत घराघरात सर्व्हे सुरू केला आहे. साधारपणे चारशेच्या दरम्यान लोकसंख्या असलेल्या गावात सर्वांचीच कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल १०४ जणांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे. यामध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. यातील सर्वांची प्रकृती चांगली असून येथील कोरोनाची साखळी तोडण्याचे प्रयत्न सुरू आहेत.