शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

corona virus :बाधित कर्मचारी संख्या सातशेच्या उंबरठ्यावर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2020 6:22 PM

Coronavirus, zp, sataranews सातारा जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांत कोरोना संसर्ग सुरूच असून आता बाधित आकडा ६९१ झाला आहे. तर आणखी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत १२ कर्मचाऱ्यांचा कोरोनाने बळी गेला आहे. दरम्यान, ६२२ कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे.

ठळक मुद्देबाधित कर्मचारी संख्या सातशेच्या उंबरठ्यावर...आणखी एकाचा मृत्यू : कोरोना बळींची संख्या १२ तर ६२२ मुक्त

सातारा : जिल्हा परिषदे अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांत कोरोना संसर्ग सुरूच असून आता बाधित आकडा ६९१ झाला आहे. तर आणखी एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत १२ कर्मचाऱ्यांचा कोरोनाने बळी गेला आहे. दरम्यान, ६२२ कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आहे.जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण मार्च महिन्याच्या उत्तरार्धात आढळला. त्यानंतर विविध गावाबरोबरच शासकीय विभागातही कोरोनाचा शिरकाव झाला. तर जिल्हा परिषदेत जुलै महिन्यात कोरोना पोहोचला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अनेक विभागात कोरोनाचा शिरकाव झाला. अर्थ, रोजगार हमी योजना, बांधकाम, समाजकल्याण, शिक्षण, आरोग्य विभागात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कर्मचारी आणि अधिकारीही कोरोना बाधित होत आहेत. आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या एकूण ६९१ कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.सातारा तालुक्यात कार्यरत १३० कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कऱ्हाडमध्ये ११२, कोरेगाव १०६, खटाव ५९, खंडाळा २९, जावळी २७, पाटण ७६, फलटण ४३, महाबळेश्वर ३३, माण २८ आणि वाई तालुक्यात कार्यरत असणाऱ्या ४८ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर आणखी एका कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बळींचा आकडा १२ वर पोहोचला आहे.आतापर्यंत पाटण आणि खटाव तालुक्यात प्रत्येकी तिघां कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर सातारा व फलटण तालुक्यात कार्यरत प्रत्येकी २ आणि कोरेगाव, जावळी तालुक्यात कार्यरत प्रत्येकी १ कर्मचारी कोरोनाने मृत्युमुखी पडला आहे. कोरोनावर मात केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या तालुकानिहाय...

जिल्हा परिषदेच्या ६९१ कर्मचाऱ्यांना कोरोना झाला आहे. त्यामधील ६२२ जणांनी कोरोनावर मात केली. यामध्ये कोरेगाव तालुक्यातील ९४ जणांचा समावेश आहे. तसेच सातारा तालुक्यातील १२२, पाटण ६८, कऱ्हाड १०८, महाबळेश्वर ३३, खटाव ४५, वाई ४३, फलटण ३४, खंडाळा २९, जावळी २३ आणि माण तालुक्यात कार्यरत २३ जणांनी कोरोनावर मात केली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसरhospitalहॉस्पिटल