शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्री कारखान्याची सभासदांना अन्यत्र विल्हेवाटची नोटीस, शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन 

By नितीन काळेल | Updated: January 31, 2024 18:55 IST

सातारा : कऱ्हाड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने सभासदांना अन्यत्र विल्हेवाटची नोटीस पाठवल्याचा निषेध रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेने ...

सातारा : कऱ्हाड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने सभासदांना अन्यत्र विल्हेवाटची नोटीस पाठवल्याचा निषेध रघुनाथदादा पाटील प्रणित शेतकरी संघटनेने केला आहे. त्याचबरोबर ही नोटीस रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनही सुरू केले आहे.याबाबत शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, सह्याद्री साखर कारखान्याने सभासदांना अन्यत्र विल्हेवाट अशी नोटीस पाठविली आहे. कारखान्यास ऊस न दिल्यास, कारखान्याचे नुकसान झाल्यास भरपाई म्हणून दंड वसूल करण्यास तुम्ही पात्र आहात, अशी ही नोटीस पाठविण्यात आलेली आहे. याबाबत १५ दिवसांत उत्तर न दिल्यास कारवाई करण्यात येईल असेही स्पष्ट केलेले आहे. असे असलेतरी ५३ वर्षांत कारखान्याला सभासद दिसले नाहीत. कारखाना नफ्यात म्हणून कधीही एक रुपयाही बोनस दिला नाही. मागील दोन वर्षांत तर डिस्टीलरी व मशीनरीचे काम सुरू असताना मोजक्या यंत्रणेवर कारखाना सुरू होता. त्यावेळेसही कारखान्याने तुम्ही ऊस कुठे घालता म्हणून शेतकरी आणि सभासदांची विचारपूस केली नाही. आता कारखान्याने सभासदांसाठी चुकीची नोटीस काढली आहे.कारखान्याने असे न करता नोंद करतील त्यांचा ऊस वेळेवर न नेल्यास कारखाना जबाबदार राहील. शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास कारखाना भरपाई देईल. शेतकरी आणि सभासद दुसऱ्या कोणत्याही कारखान्याला ऊस घालणार नाहीत, अशी नोटीस द्यायला हवी होती. कारण, सातारा तालुक्यातील तारगाव पंचक्रोशीत सह्याद्री कारखान्याच्या फक्त पाच टोळ्याच कार्यरत आहेत. तर इतर कारखान्यांच्या कोणाच्या १५ तर कोणाच्या ४० टोळ्या आहेत. असे असेलतर सह्याद्री कारखान्याला वेळेत कसा ऊस जाईल. कारण, मुळात कारखान्याची यंत्रणा आणि टोळ्या कमी आहेत. त्याचा दोष सभासदांच्या माश्यावर मारु नये. तसेच यातून कारखान्याचे सभासदत्व घालविण्यासाठीच हे नियोजन आहे. यासाठी सभासदांना आलेली नोटीस रद्द करण्यासाठी आंदोलन करण्यात येत आहे.या आंदोलनात शेतकरी संघटनेचे शेतकरी संघटनेचे कऱ्हाड उत्तर अध्यक्ष वसीम इनामदार, लक्ष्मण मोरे, सुहास पाटील, परबती तावरे, अमिर मुल्ला, सज्जन पवार, महिपती घाडगे, दस्तगीर इनामदार, युनूस इनामदार, दिलावर पटेल, जावेद इनामदार आदी सहभागी झाले आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcollectorजिल्हाधिकारीFarmerशेतकरीagitationआंदोलनSugar factoryसाखर कारखाने