ना कॉल ना ओटीपी तरीही बँकेतून पैसे गायब! अनोळखी ॲप परमिशन टाळा!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:26 IST2021-06-20T04:26:05+5:302021-06-20T04:26:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : स्मार्ट आणि अँड्रॉइड फोन हाताळताना विविध फ्री गेम आणि अनोळखी मोबाइलमध्ये डाउनलोड केल्यानंतर अनेकांच्या ...

No call, no OTP, money disappears from the bank! Avoid unfamiliar app permissions !! | ना कॉल ना ओटीपी तरीही बँकेतून पैसे गायब! अनोळखी ॲप परमिशन टाळा!!

ना कॉल ना ओटीपी तरीही बँकेतून पैसे गायब! अनोळखी ॲप परमिशन टाळा!!

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : स्मार्ट आणि अँड्रॉइड फोन हाताळताना विविध फ्री गेम आणि अनोळखी मोबाइलमध्ये डाउनलोड केल्यानंतर अनेकांच्या खात्यांतून पैसे गायब झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. अशा वेळी ना कोणाला ओटीपी दिला ना कोणाला कॉल आला, तरीही बँक खात्यातून पैसे गायब झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. आता मात्र फ्री गेम आणि अनोळखी ॲप डाउनलोड केल्यानंतर हे प्रकार घडत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे स्मार्ट आणि अँड्रॉइड फोन हाताळताना अशा प्रकारच्या गेमला, अनोळखी ॲपला डाउनलोड करण्यास परमिशन टाळा, असा सल्ला सायबरतज्ज्ञ देत आहेत.

मोबाइलमध्ये विविध गेम, वेब सीरिज, मूव्हीज फ्रीमध्ये देण्याचे आमिष देऊन अपडेट डाउनलोड करण्यासाठी प्रेरित करण्यात येते. त्यानंतर यामध्ये ऑटो रीड ओटीपी ही प्रक्रिया असल्याने आपण ते ॲप डाउनलोड करतो. त्यामुळे बँक खात्यातून पैसे गायब होत असल्याचे प्रकार वाढले आहेत. स्मार्ट आणि अँड्रॉइड फोन वापरताना अशा प्रकारचे ॲप डाउनलोड करणे टाळावे, हाच एकमेव यावर उपाय असल्याचे सायबरतज्ज्ञांचे मत आहे. अन्यथा, ओटीपी न मागताच बँक खात्यातून पैसे गायब होत आहेत. त्याला मुख्य कारण म्हणजे आपल्या मोबाइलमध्ये फ्री गेम, अनोळखी ॲप डाउनलोड करणे हेच असल्याचेही सायबरतज्ज्ञांचे म्हणणे आहे.

चौकट : पैसे परत मिळण्याची शक्यता कमीच

आपल्या बँक खात्यातून पैसे ऑनलाइन ट्रान्सफर झाल्यानंतर किंवा ते खात्यातून गायब झाल्यानंतर २४ तासांच्या आत सायबर पोलीस स्टेशन किंवा सायबर सेलकडे तक्रार करणे गरजेचे आहे. मात्र, त्यानंतर वेळ झाल्यास ऑनलाइन पळवलेली रक्कम मिळण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली.

सहा महिन्यांत १३ लाखांची रक्कम मिळवली परत

ऑनलाइन फसवणूकद्वारे बँक खात्यातून पैसे पळवल्यानंतर सातारा सायबर पोलिसांनी सहा महिन्यांच्या कालावधीत १३ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम परत मिळवली आहे.

फलटण येथील एका युवकाचे वीस हजार रुपये अचानक खात्यातून गायब झाले होते. या प्रकारानंतर संबंधित युवकाने तत्काळ सायबर सेलशी संपर्क साधून आपल्या बँक डिटेलची सर्व माहिती दिली. त्यानंतर काही दिवसांतच त्या युवकाची वीस हजार रुपयांची रक्कम परत त्याच्या खात्यात जमा झाली.

चौकट : अनोळखी ॲप नकोच

बँक खात्यातून ऑनलाइन व्यवहार करताना तुमच्या मोबाइलमध्ये अनोळखी ॲप डाउनलोड करण्यास परवानगी द्यायलाच नको. कोणतेही गेम किंवा अनोळखी ॲप डाउनलोड करू नये.

विविध आमिषे देणारे मेसेजेस आल्यास त्याकडे दुर्लक्ष करावे. ते मेसेज डिलीट करावेत, अशा प्रकारे प्रत्येक व्यवहार करताना काळजी घेतल्यास व अनोळखी ॲण्ड फ्री गेम डाउनलोड न केल्यास तुमची रक्कम सुरक्षित राहू शकते.

चौकट : वर्षाला लाखो रुपयांची फसवणूक

तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेटचा वापर वाढला. ऑनलाइन बँकिंग ऑनलाइन खरेदी यासह विविध सहज गोष्टी आपल्याला उपलब्ध झाल्या. विमानाचे तिकीट ऑनलाइन काढण्यात येत आहे, अशा प्रकारच्या ऑनलाइन सुविधांमुळे ऑनलाइन फसवणुकीचे प्रकारही अलीकडे वाढले आहेत

वर्षाला ४० ते ५० लाख रुपयांचा गंडा ऑनलाइनच्या माध्यमातून घातला जातो. त्यामुळे नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना सावध राहणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

कोट : तुम्ही कोणत्याही लॉटरीचे तिकीट घेतले नसतानाही तुम्हाला लॉटरी लागल्याचे आमिष देऊन तुमच्या मोबाइलवरील ओटीपी घेऊन रक्कम काढली जाते. मात्र, आता सायबर चोरट्यांनी आणखी एक पाऊल पुढे टाकत विविध तसेच लिंक पाठवून तुमच्या खात्यातील रक्कम पळवण्याचा अनोखा फंडा शोधला आहे. त्यामुळे ऑनलाइन व्यवहार करताना नागरिकांनी पूर्णत: सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे.

चौकट ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे

२०१९ - १७२५

२०२०- ४०३१

२०२१ मे पर्यंत ६६

Web Title: No call, no OTP, money disappears from the bank! Avoid unfamiliar app permissions !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.