सातारच्या नितीनचा ‘अवतार’ सर्वश्रेष्ठ!

By Admin | Updated: August 13, 2014 23:37 IST2014-08-13T23:18:12+5:302014-08-13T23:37:41+5:30

शाहूनगरी आनंदली : उत्कृष्ट चित्रपटासह संवाद-दिग्दर्शनाचे राज्य पारितोषिक

Nitin's 'Avatar' best of Satara | सातारच्या नितीनचा ‘अवतार’ सर्वश्रेष्ठ!

सातारच्या नितीनचा ‘अवतार’ सर्वश्रेष्ठ!

सातारा : कायम वेगळ्या वळणाच्या कलाकृती देणारा सातारचा तरुण लेखक नितीन दीक्षित ऊर्फ सातारकरांचा लाडका ‘विशा’ राज्य पुरस्कारांत सर्वश्रेष्ठ ठरल्यामुळे शाहूनगरीच्या सांस्कृतिक वर्तुळात आनंद व्यक्त होत आहे. त्याचा ‘अवताराची गोष्ट’ चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला असून, उत्कृष्ट संवादांसह दिग्दर्शनाच्याही पहिल्या पारितोषिकावर नितीनने नाव कोरले आहे.
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे राज्य चित्रपट पारितोषिक सोहळा मंगळवारी रात्री रंगला. या सोहळ््यात सर्वोत्कृष्ट संवादाचे पारितोषिक नितीनला ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि अभिनेत्री चारुशिला साबळे-वाच्छानी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार सचिन आणि सुप्रिया पिळगावकर या महाराष्ट्राच्या लाडक्या जोडगोळीने प्रदान केला.
‘ही माझीच गोष्ट आहे. आपण आपलं लहानपण फक्त घटनांमधून आठवतो.
पण लहानपणी आपण विचार कसा करत होतो, हे आपण आठवत नाही. ते आठवलं, तर तुमचं आयुष्य समृद्ध होऊ शकतं, हेच मला या चित्रपटातून सांगायचंय,’ असे नितीनने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Nitin's 'Avatar' best of Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.