शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

निरा देवघरचे पाणी डेटा बदलून बारामतीला वळविले, केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावतांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 16:28 IST

केंद्र सरकार निरा देवघर आणि कृष्णा भीमा प्रकल्पासाठी भरीव निधी उपलब्ध करून देईल

नसीर शिकलगार

फलटण: निरा देवघर प्रकल्प हा तत्कालीन सरकारने रखडला असून याचे हककाचे पाणी  डेटा बदलून बारामतीला वळविण्याचा गंभीर आरोप केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी केला. केंद्र सरकार निरा देवघर आणि कृष्णा भीमा प्रकल्पासाठी भरीव निधी उपलब्ध करून देईल आणि दुष्काळी भागाचा पाणी प्रश्न कायमचा सोडवेल अशी ग्वाही मंत्री शेखावत यांनी यावेळी दिली.रखडलेला निरा देवघर सिंचन प्रकल्प मार्गी लावण्याच्या अनुषंगाने व कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेला मार्गी लावण्याच्या हेतूसाठी केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी आज, सकाळपासून पुण्यातून हेलिकॉप्टरने हवाई पाहणी केली. यानंतर त्यांनी पंढरपूर येथे पत्रकार परिषदे घेतली. यावेळी त्यांनी हा गंभीर आरोप केला. यावेळी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार शहाजीराव पाटील, आ. समाधान अवताडे, माजी आमदार  प्रशांत परिचारक आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना मंत्री शेखावत म्हणाले, माढा लोकसभा मतदारसंघातील पाणी प्रश्न संदर्भात यापूर्वी खासदार नाईक निंबाळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व माझ्याशी वारंवार संवाद साधून पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी केली होती. त्या अनुषंगाने प्रत्यक्ष हवाई पाहणी दौरा करून निरा देवघर व कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाचा आढावा घेतला. यापूर्वीच्या सरकारने प्रकल्प रखडवलायापूर्वीच्या सरकारने राजकारण आणून निरा देवघर व कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प रखडविला होता. तत्कालीन सरकारने प्रकल्प रखडवितानाच स्थानिकावर अन्याय करून निरा देवघरचा डेटा बदलून हे पाणी बारामतीकडे वळविले होते व दिशाभूल केली होती. याचा रिपोर्ट आपल्याकडे आहे असे स्पष्ट करून निरा देवघर सिंचन प्रकल्पाला तीन हजार नऊशे कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता राज्य सरकारने दिली असल्याने केंद्र सरकार सुद्धा या प्रकल्पासाठी गांभीर्याने निधी उपलब्ध करून देईल व सातारा, सोलापूर जिल्ह्यातील पाणी प्रश्न कायमचा संपवून टाकेल असे गजेंद्रसिंह यांनी स्पष्ट केले.अत्यंत सुनियोजित पद्धतीने पूर्वीच्या सरकारने निरा देवघरचे हक्काचे पाणी बारामतीला वळविले होते. याबाबत आपण केंद्र व राज्य सरकारला सर्वेक्षण करण्याची मागणी केली होती. त्यामध्ये हक्काचे पाणी बारामतीला दिल्याचे उघडकीस आले आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून हे प्रकल्प मार्गी लावण्याची ग्वाही शेखावत यांनी दिल्याने पाणी प्रश्न संपुष्टात येईल असे खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRanjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकरWaterपाणी